Now Reading:
भरपूर पैसा कमवून श्रीमंत व्हायचंय? मग हे वाचा
भरपूर पैसा कमवून श्रीमंत व्हायचंय? मग हे वाचा

आजकालची मुलं तशी जास्त कमावतात व त्याप्रमाणे त्यांची जीवनशैलीसुद्धा आरामदायक होतेय. पण यात केवळ त्यांच्या जीवनशैलीत श्रीमंती दिसून येत असून, ते पैशाने काही श्रीमंत होत नाहीत. कारण पैसा येतो तशी उधळपट्टीही वाढते त्यामुळे गुंतवणूक करणे आवश्यक असते. म्हणूनच लहान वयापासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे कधीही चांगले. कर्जमुक्त जीवन, ऐशोआरामाचं आयुष्य असे बरेच फायदे आहेत. याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख-

कंपाउंडींग

कंपाउंडींग म्हणजे गुंतवणूकीतून जमलेल्या पैशांना पुन्हा गुंतवून आणखी जास्त कमाई करणे. सुरवातीला गुंतवणूकीचा हा प्रकार फारच धीम्या गतीचा वाटेल पण काळानुरुप नफ्याचं स्वरूप मोठं होत जातं. यात तुम्ही जितका जास्त वेळ पैसा गुंतवून ठेवता तितका जास्त तुम्हाला फायदा होईल.

जोखीम घ्यायची तयारी

इक्वीटी व म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर जास्त फायदा होतो. यामध्ये जोखीम तर असते पण गुंतवणूकीची परतफेडही तशीच भरघोस असते. तरूण वयात जेव्हा अंगावर पारिवारिक जबाबदाऱ्या नसतात तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोपे होते. जसजसं वय वाढतं तशा जबाबदाऱ्या वाढत जातात. म्हणून तरुणांनो, ऑनलाइन डिमॅट अकाउंट उघडून गुंतवणूक करण्यास सुरु करा.

रिटायरमेंटच्या वेळेस फायदा

निवृत्तीसाठी रिटायरमेंट प्लॅनमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर छोट्या हफ्त्याने पैसे गुंतवता येतात. उशीराने सुरु केलेल्या रिटायरमेंट प्लॅनमुळे विनाकारण आर्थिक तणाव येतो कारण हफ्त्याचे स्वरूप मोठं असतं. Systematic Investment Plans (SIPs) वापरून म्युच्युअल फंड्सच्या सहाय्याने रिटायरमेंट राशी जमा करता येते.

कर्जाचं ओझं नाही

कर्जाच्या काळजीपूर्वक आखणीमुळे खर्चाचं व्यवस्थापन करणं सोपं होऊन जातं. तसेच मोठ्या खरेदीच्या वेळेस आधी केलेली गुंतवणूक कामी येते. ज्यामुळे खरेदीच्या वेळेस हफ्त्याची किंमत कमी होते व व्याजही कमी द्यावे लागते. म्हणून तरूण वयात केलेली गुंतवणूक कर्जमुक्त जीवन जगण्यास मदत करते.

पैशाच्या व्यवस्थापनाचे कौशल्य

बहुतेक तरूण कामाला लागेपर्यंत आपल्या परिवारावर अवलंबून असतात. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक करायला घेतल्यास पैशाची खरी किंमत लवकर कळते. तसेच व्यवहारिक शिस्तही लागते. या शिस्तीचा फायदा उतारवयात होतो. वयाबरोबर उत्पन्न वाढत जातं, तेव्हा ही खर्च आणि गुंतवणूकीची शिस्त कामी येते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.