ग्रामीण ओडिशातील शेकडो महिलांसाठी “त्रिपती” नावाचं ओडिशा रूरल लाईवलीहूड प्रोजेक्ट एक आशेचा किरण झाला आहे. २००९ मध्ये स्थापित झालेल्या त्रिपतीने सामाजिक व आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी सामाजिक बचत गट आणि व्यावसायिक बचत गट देखील उभारले आहेत. ‘सेल्फ हेल्प ग्रुप्स'(SHG) नावाने यांना ओळखले जाते. त्रिपतीने अनेक कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यांचे आयुष्य सुधारले आहे.
त्रिपतीने बदलले तिचे जग
या गावातील प्रत्येक महिलेच्या दिवसाची सुरुवात तिच्या मुलाबाळांना तयार करण्यात जाते. कुटुंबाची काळजी घेऊन झाल्यावर ही महिला आपल्या व्यवसायाच्या कामाला सुरुवात करते. आधी त्यांच्या घरात त्यांचे पतीच मूळ कमावणारे होते, पण SHG च्या मदतीने घरातील महिलाही अार्थिकरित्या हातभार लावू शकते. गावातील प्रत्येक महिला, मग ती कोणत्याही कुटुंबातून का असो तिला SHG मध्ये तिची एक जागा दिली गेली आहे.

Image: Pixabay
त्रिपतिचा काळ
आज त्रिपतीला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. एकूण ९ लाख २९ हजारपेक्षाही अधिक घरांना आधार देऊन सुधारण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणूनच आज ओडिशा हे एक सर्व गुण सक्षम गाव म्हणून ओळखलं जातं.