Now Reading:
महिलांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती
महिलांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती

भारतात अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृती चालत आली आहे. पण गेल्या काही वर्षात आपल्याला समाजात होणारा बदल जाणवतोय. महिला व पुरुषांना आपआपली कर्तव्ये बालपणापासूनच नेमली गेली आहेत. त्यानुसार प्रत्येकाने एका विशेष पद्धतीनेच वागलं पाहिजे. महिला घर सांभाळतील आणि पुरुष कुटुंबाचं रक्षण करतील. हे चित्र गेल्या काही वर्षात बदलताना दिसतंय. 

धैर्यशील संस्कार-

अश्याच प्रकारे महिलांवर होणारा अत्याचार समाजापासून काही लपून नव्हता. पण आधुनिक काळात महिला स्वतःचा आवाज उठवून सत्याला जिंकवू शकतात. पुरुष नेहमीच रक्षणाचे काम नाही साकारत. अनेकदा हेच पुरुष हैवानाचे रूप घेऊन स्त्रियांवर अत्याचार करतात. पण आता महिलांनाच स्वतःचं व स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करण्याइतपत धैर्यशील होण्याचा काळ आला आहे.

आपल्या मुलींना काळोखात सुरक्षितरित्या घरी पोहोचता येईल ह्याची काळजी ते स्वतः घेऊ शकतील एवढं सक्षम त्यांना बनवा. कोणती जागा सुरक्षित, कोणती असुरक्षित याची जाणीव त्यांना व्हावी ह्याची शिकवण त्यांना द्या.  

या सगळ्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त मुलं आणि पुरुषांना त्यांच्या मर्यादांची जाणीव असणं जास्त गरजेचं आहे.

Input your search keywords and press Enter.