पैसा काय झाडाला लागत नाही, पण माणसाची गरज आणि महागाई मात्र झाडाला लागल्यागत वाढत जाते. अशावेळी बजेटिंगचं कोडं सुटणं फार महत्त्वाचं झालंय. पगार झालाय म्हणून पैसा उधळला आणि मग महिन्याअखेरीस कुढत दिवस काढण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच घेऊन आलोय तुमची महिन्याभराच्या खर्चाचं साधं सोपं व्यवस्थापन करण्याची हि साधीसरळ शक्कल-
बजेटचे प्रकार-
अतिरिक्त: ज्यात खर्चापेक्षा कमाई जास्त असते.
संतुलित: ज्यात खर्च आणि कमाई जेमतेम सारखीच असते.
तूट: ज्यात खर्च कमाईपेक्षा जास्त असतो.
बजेटिंग कशी करावी?
१.पेन,पेपर आणि कॅलक्युलेटर घेऊन एक यादी तयार करा.
२.यादीच्या शीर्षकस्थानी महिन्याभराच्या एकूण मिळकतीचा आकडा लिहा.
३.त्याखाली महिन्याभराच्या अंदाजे खर्चांची नोंद करा. (बिल, रेशन, फि, भाडे, बस पास, इतर वस्तूंचा खर्च इत्यादी)
४.त्यानंतर तुमच्या एकूण झालेल्या खर्चाची यादी करा.
५.मग घरातील सर्व व्यक्तींना समोर बसवून यावर चर्चा करा.
६.त्यांना तुमचा बजेटचा विचार समजावून सांगा.
७.कोणकोणत्या जागी तुम्ही वायफळ खर्च कमी करू शकता यावर चर्चा करा.
८.चर्चेत घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणी करा.
९.हे दर महिन्याला करत राहा.
बजेटिंग का करावी?
बजेटचा तोटा असा काहीच नाही. बजेट केल्याचा सर्वात मोठा फायदा हा की, पैसा तुमच्या जीवनशैलीवर हावी न होता तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर नियंत्रण मिळवता. बजेटिंगमुळे घरातील आर्थिक तणाव कमी होतो आणि केलेल्या बचतीतून तुमची इतर ऐशोआरामाची स्वप्नं पूर्ण करण्यास मदत होते.
काढा तर पेन, पेपर नि कॅल्क्युलेटर आणि बना घरचे फायनान्स मिनिस्टर!