Now Reading:
महिलांना घरबसल्या करता येतील असे ५ व्यवसाय
महिलांना घरबसल्या करता येतील असे ५ व्यवसाय

कधी कधी बाळंतपणानंतर मुलांची जबाबदारी असल्यामुळे महिलांना नोकरी करणं कठीण होतं. सध्याच्या काळात तुम्ही उत्पन्नाचे असे काही उपाय करून पाहू शकता ज्याने तुम्हाला घर बसल्या काम करता येईल आणि तुमच्या मुलांकडे सुद्धा पूर्ण लक्ष देता येईल.

हे आहेत पाच व्यवसाय ज्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराला उत्पन्नात हातभार लावू शकता.

मेस किंवा टिफिन

स्त्रियांना बहुतेक वेळा स्वयंपाक करण्याची आवड असते आणि हे काम त्या उत्तमरित्या पार पडतात. यामुळे मेस अथवा टिफिनचा व्यवसाय चालवणं हे उत्पन्नाच एक अतिशय उत्तम साधन बनू शकतं. घरापासून दूर असलेल्या नोकरदारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हा व्यवसाय चालवू शकता.

फ्रीलान्स लेखन

ज्या स्त्रियांना लेखनाची आवड असेल आणि ज्यांच्याकडे उत्तम लेखनशैली असेल त्या महिला फ्रीलान्स लेखन करू शकतात. तुम्ही एका लेखावर कमीत कमी २०० ते ३०० रुपये कमवू शकता. वर्तमानपत्रात, किंवा ऑनलाइन वेबसाइटवर फ्रिलान्स लेखकांची गरज असते.

ब्युटीशियन

ब्युटी प्रॉडक्ट्स आणि मेकपची आवड असलेल्या महिला याच आवडीच रूपांतर व्यवसायात करू शकतात. लग्न कार्य, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांच्या ऑर्डर घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चालवू शकता.

शिकवणी

तुम्ही लहान वर्गातील मुलांना शिकवणी देऊ शकता. लहान मुलांना अभ्यासात मार्गदर्शन देणं, त्यांच पाठांतर करून घेणं, शुद्धलेखन शिकवणं, हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

छंद वर्ग

चित्रकला, संगीत, नृत्य, स्वयंपाक, शिवणकाम, भरतकाम अश्या विविध कलांची आवड जर तुम्हाला असेल तर तुम्ही छंद वर्ग चालवू शकता. हे देखील कमाईचं एक उत्तम साधन आहे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.