Now Reading:
या ३ महिलांनी आपल्या कीर्तीने तोडल्या तथाकथित पुरुषप्रधान समाजाच्या बेड्या
या ३ महिलांनी आपल्या कीर्तीने तोडल्या तथाकथित पुरुषप्रधान समाजाच्या बेड्या

जेव्हा या तथाकथित पुरुषप्रधान समाजात महिला आपल्या जिद्दीच्या जोरावर जिंकतात तेव्हा ती केवळ कौतुकाची नाही तर आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे. आज आपण अशाच तीन अपूर्व कहाण्या साजऱ्या करणार आहोत.

नरुती देवी-

women breaking stereotypes

रस्त्यावर कंत्राटी मजुरी करून आपला दिवस भागवणारी ही एक मागासवर्गीय महिला, पण त्यातही आपल्या काबाडकष्टाचा योग्य मोबदला तिला मिळत नसे. म्हणून तिने आपल्याबरोबर इतर मजुरांना घेऊन आवाज उठवला. लोकांनी तिला थेट सरपंच म्हणून निवडून दिलं.

८० च्या दशकात लोकांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांबद्दल जागरूक करण्यासाठी गावोगावी जात. यातूनच पुढे देशातील ‘माहिती अधिकार २००५’चा पाया रचण्यात आला.

ज्योती रेड्डी-

women breaking stereotypes

एका गरीब कुटुंबातला जन्म, १६ व्या वर्षी लग्न. तिथून स्वतःच्या जिद्दीवर आपल्या २ मुलींचं शिक्षण आणि रोजचे कॉम्प्युटर क्लासेस असं करत या महिलेने सत्यात अवतरलं तिचं अमेरिकचं स्वप्न. अनाथालयात वाढलेल्या या महिलेची आज स्वतःची आय टी कंपनी आहे.

सत्यमंगलमच्या महिला सत्यजित रे-

women breaking stereotypes

तामिळनाडूमधील सत्यमंगलम भागातील महिलांनी उभं आयुष्य उपेक्षा व अवहेलना सहन केली. पण त्यांच्या गावी ‘साइन्स’ अॅण्ड ‘एड एट अॅक्शन इंटरनॅशनल’ची फिल्म मेकिंग कार्यशाळा झाली तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला एक नवा ट्वीस्ट मिळाला. इथल्या महिला आता हातात कॅमेरा आणि मनात वर्षानुवर्षे असलेली धगधगती आग घेऊन आपल्या मनात कण्हत असलेल्या असंख्य वेदनांचे चित्रपट बनवतात. ही समाजातील विषमतेला वाचा फोडणारी चळवळ नुसतीच कौतुकास्पद नाही तर समाजाला भानावर आणणारी आहे.

 

Input your search keywords and press Enter.