Now Reading:
SHG मार्फत भारतातील दारिद्रय रेषेखालील महिला करु शकतात गरिबीवर मात
SHG मार्फत भारतातील दारिद्रय रेषेखालील महिला करु शकतात गरिबीवर मात

१२१ कोटी लोकांच्या या देशात २२ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. शहरीकरणाने बऱ्याच नव्या संधी उपलब्ध करून दिल्या पण असे होत असतानाच कृषी क्षेत्रावर याचे वाईट पडसाद उमटलेत, मग प्रश्न पडतो की देशातील जनतेच्या आर्थिक प्रगतीसाठी करावं तर काय? इथे होते SHG ची एंट्री, आज जाणून घेऊ SHG बद्दल.

SHG म्हणजे नेमकं काय?

SHG म्हणजे ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ जिथे समान आर्थिक क्षमतेची माणसे एकत्रितरित्या बचत करतात. ठराविक राशी जमा झाल्यावर SHG मधील सभासद एकमेकांकडून पैसे उसने घेऊ शकतात. भारतात बऱ्याच SHG बँकांशी संलग्न असतात जेणेकरून त्यांना जमा राशीच्या व्याजावर कमाई करता येते.

भारतात मैसूर पुनर्वसन व विकास संस्थेअंतर्गत (MYRADA) पहिला SHG सुरु झाला. भारतामधील SHG च्या यापुढील प्रवासाचा आढावा.

१९८७: कृषी व ग्रामीण विकास राष्ट्रीय बँकेने (NABARD) MYRADA ला १० लाख रुपयांचं अनुदान दिलं. जेणेकरून त्यांना आपल्या उपक्रमांच्या प्रसारासाठी मदत होईल.

१९८०: रिजर्व्ह बँकेने SHG ला पर्यायी क्रेडिट मॉडेल म्हणून मान्यता दिली

१९९२: NABARD ने मार्गदर्शिका निर्माण केली त्यामार्फत बँकांना सरळ SHGs ना पैसे देता येतील.

१९९२: SHG-बँक लिंकेज प्रोग्राम सुरु करण्यात आला.

SHG ची गरज का आहे?

दारिद्र्य रेषेखालील महिलांना कायम दुय्यम दर्जा दिला जातो. घर असो वा समाज सगळीकडेच त्यांना दुर्लक्षित केलं जातं. महिला या आर्थिक साखळीमध्ये कायम सर्वात दुबळ्या आहेत आणि त्यांना या साखळीतून बाहेर पडता येत नाही. यासाठीच SHG ची एकजूट कामी येते. एकत्रितरित्या तिला समाजात प्रगती करता येते, आर्थिक सुरक्षितता प्राप्त करता येते.

Input your search keywords and press Enter.