Now Reading:
आनंदापेक्षाही ही गोष्ट सर्वात अधिक महत्त्वाची
आनंदापेक्षाही ही गोष्ट सर्वात अधिक महत्त्वाची

तत्वज्ञानी, धर्मशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सकारात्मक वागणूक आणि विचारांवर भर दिला आहे. मनोवैज्ञानिक केवळ सकारात्मक भावनांकडे भर देत नाहीत तर आनंद कसा मिळवावा तेसुद्धा सांगतात. आनंद ही एकच भावना आहे जी चांगलं आयुष्य घडवू शकते.

आनंद म्हटल्यावर तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं?

समुद्रकिनाऱ्यावर बसून खाणे, पिणे आणि मजा करायला कोणाला नाही आवडत? पण संपूर्ण आयुष्य असंच घालवलं तर त्यातली मजा निघून जाते.खूप श्रीमंत घरात वाढणाऱ्या अनेक मुलांना पाहा. जेव्हा सर्वकाही आपल्यासाठी उपलब्ध असतं तेव्हा काहीही न करणे अशक्य नाही. परंतु याने आनंद मिळेलच असं नाही.

अश्या किती तरी गोष्टी आहेत ज्यांचा लाभ घेण्यासाठी पैश्यांची गरज लागते. पण या गोष्टींनी मनातील सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नाही. म्हणूनच या भावनेला आनंद या नावापेक्षा वेगळं नाव देता येईल ते म्हणजे – उपयुक्तता (Usefulness). आनंदावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही कोणासाठी तरी कसे उपयुक्त ठराल यावर लक्ष द्या.

जेव्हा आपण जगाला काही तरी योगदान देण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा आपसूकच तुमच्या मनाला आनंद मिळतो. आपण ज्यासाठी संघर्ष केला त्या उद्देशाची जाणीव आपल्याला राहते आणि त्या दिशेने आपण काम करत राहतो.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.