Now Reading:
महिलांकरीता आरोग्य विमा असणं गरजेचं का आहे? या जाणूया
महिलांकरीता आरोग्य विमा असणं गरजेचं का आहे? या जाणूया

जेव्हा पैशांची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हुशारीने वागतात, असं म्हटलं जातं. आज काल स्त्रिया स्वतःच्या घराची जबाबदारी सांभाळून बँकेत आणि विविध आर्थिक क्षेत्रात काम करताना दिसतात. आजच्या घडीला देशातील टॉप ५ बॅंका महिला चालवत आहेत. फोर्ब्स अनुसार अरुंधती भट्टाचार्य या भारताच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, ज्या सगळ्यात मोठी पब्लिक बँक सेक्टर चालवतात. त्या जगातील २५व्या शक्तिशाली महिला आहेत. चंदा कोच्चर आणि शीख शर्मा या दोन बँकांना मोठं करायच्या मार्गावर आहेत. या महिलांना देशातील प्रेरणादायी स्त्रिया म्हणून ओळखलं जातं.

पण जेव्हा स्वतः गुंतवणूक(Investment) करण्याची वेळ येते, तेव्हा स्त्रियांना एका प्रकारची काळजी आणि भीती वाटते. घराचा कारभार सांभाळण्यात त्यांना जास्त आत्मविश्वास वाटतो. परंतु, स्वतःच्या कुटुंबासोबत आर्थिक समस्यांबद्दल चर्चा करणं त्यांना पटत नाही. कारण स्त्रिया घरची जबाबदारी सांभाळणं लहानपणीच शिकतात.

आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांचं असं म्हणणं आहे की महिलांना पुरुषांपेक्षा हाय रिस्क आहेत. त्या डॉक्टरांकडे अधिक जातात. बाळांना जन्म देणं, सांभाळणं ह्यात त्यांच्या स्वास्थ्याची ओढाताण होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला अधिक धोका असतो. आरोग्य विमा असल्याने महिलांना संकटाच्या वेळेस सुरक्षित भासू शकतं. आधुनिक महिला काम आणि घर दोन्ही सांभाळतात. त्याच्याकरिता हे अगदीच गरजेचे आहे.

Input your search keywords and press Enter.