Now Reading:
या महिलेच्या जिद्दीने बदलला तामिळनाडूमधील एका गावाचा चेहरा; गाव होतंय स्वच्छ आणि सुंदर!
या महिलेच्या जिद्दीने बदलला तामिळनाडूमधील एका गावाचा चेहरा; गाव होतंय स्वच्छ आणि सुंदर!

देशातील बहुतेक खेडोपाडी स्वच्छता व मलविसर्जन या प्रमुख समस्या आहेत. त्यासाठी सरकारसुद्धा बरीच पावलं उचलतंय. पण तामिळनाडू, त्रिचीमधील समुथिरम या गावात एक कर्तव्यदक्ष महिलेने सरकारची वाट न पाहता स्वतःच आपलं घर, आपलं गाव सुधारायची चळवळ सुरु केली.

 

स्वच्छता अभियान-

लक्ष्मी पेरियास्वामी या सामान्य महिलेच्या असामान्य निर्धाराने तिच्या गावाचा चेहरामोहराच बदलला. लक्ष्मीने प्रथम गावच्या युनियन ऑफिसमध्ये रस्त्यावरचा कचरा व्यवस्थापन योजनेत स्वयंसेवक म्हणून प्रवेश घेतला. लोक जागोजागी कचरा करत म्हणून नाक्यानाक्यावर कचऱ्याचे डबे बसवले. त्यासोबतच लोकांना त्यांच्याकडील प्लास्टिकचा कचरा विकत यावा यासाठी एक केंद्रही उभं केलं.

 

मलविसर्जन-

यानंतर लक्ष्मीजी मलविसर्जनाकडे वळल्या. तेव्हा त्यांच्या स्वतःच्या घरीसुद्धा शौचालय नव्हते. पण हळहळू गावचं चित्र पालटलं. पंचायतीच्या मते गावात १५ हून कमी घरी शौचालय नाहीये. मात्र, सत्यपरिस्थिती फार वेगळी आहे, असं लक्ष्मीजी सांगतात.

 

प्रगतीचं स्वरूप-

सुरुवातच करायची झाली तर आता किमान शौचालय आहेत! अजूनही जे उघड्यावर शौच करतात त्यांच्या शौचाच्या वेळेस जाऊन त्यांच्यावर मिश्कीलपणे हसण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. लोक वैतागू लागले पण शेवटी त्यांना त्यामागचं उद्देश्य लक्षात आलं, जेव्हा त्यांना आरोग्याचे फायदे समजावून देण्यात आले तेव्हा गाव शौचालय नसतानाही हगणदारीमुक्त झाले.

लक्ष्मीजी आता ग्रामपंचायत विकास योजनेअंतर्गत समुथिरमच्या प्रतिनिधी आहेत. हे पद जरी हुद्द्याने मोठं नसलं तरी तळागाळातील पातळीवर काम करताना लक्ष्मीजींसारखी माणसंच महत्त्वाची कामगिरी बजावतात.

Input your search keywords and press Enter.