Now Reading:
कधी जाणून घेतलंय महाराष्ट्रात श्रावणात मासे का खात नाहीत? मग आज जाणून घ्या.
कधी जाणून घेतलंय महाराष्ट्रात श्रावणात मासे का खात नाहीत? मग आज जाणून घ्या.

रविवारी सकाळी खेळून परतल्यावर थेट किचनकडे धाव घ्यावी, त्यात रविवार म्हटला की जेवणात चमचमीत पापलेट नाहीतर सुरमई असणारच. आपण आतताईपणे जेवणाची भांडी उघडतो नि समोर वरण भात नि बटाट्याची भाजी! मग उभ्या जागीच चिडक्या स्वरात आईला हाक मारतो आणि आई तितक्याच शांत स्वरात उत्तर देते, ‘श्रावण लागलाय बाळा, मासे खायचे नसतात श्रावणात’

हे असं दरवर्षी होतंच होतं नाही? पण का? का खाऊ नये श्रावणात मासे? हे काही आई सांगत नाही, मग चला तर जाणून घेऊ यामागचे कारण. 

माश्यांचा प्रजनन काळ

श्रावण सुरू झाला की मासे खाऊ नको म्हणून आपण एकमेकांना सांगतो खरं पण, त्यामागचं कारण समजून घेतलं, तर तुमच्या फायद्याचं आहे. मराठी महिना श्रावण सुरू होतो, त्यावेळी माश्यांचा प्रजनन काळ सुरू होतो. या महिन्यात मासे अंडी देतात. मासेमारीच्या वेळी माश्यांची अंडी फुटतात. शिवाय यावेळी मासे खाल्ले तर त्यांच्या प्रजननावर मर्यादा येतात. प्रजनन कमी होऊन वर्षभर हवे तितके मासे खायला मिळणार नाहीत. म्हणून श्रावणात मासे खायचे नाहीत, असं सांगितलं जातं.   

खवळलेला समुद्र  

शिवाय या महिन्यात समुद्रही खळवळलेला असतो. अशा वेळी कोळी लोकांच्या नौका किनार्‍याला असतात. मासेमारीसुद्धा नेहमीपेक्षा कमी होते.

Cover Image Source: Flickr

Input your search keywords and press Enter.