Now Reading:
हॉटेलमधील पांढऱ्या चादरींमागचे गुपित
हॉटेलमधील पांढऱ्या चादरींमागचे गुपित

महागड्या हॉटेलात गेलं की तिथलं आरामदायी वातावरण, तिथला थाट किती सुखावून टाकतो ना? तिथलं नीटनेटकं वातावरण पाहून अगदी राजवाड्यात असल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का? भिंती-पडद्यांचे रंग कसेही असले तरी तेथील प्रत्येक रुममधल्या चादरी पांढऱ्याच असतात. त्याचं कारण माहितीये? या जाणून घेऊ तर-

ग्राहकांचे समाधान

पांढरी चादर असल्याने येणाऱ्या अतिथींना रूम साफ केलीय की नाही ते समजायला सोपं जातं. याने ग्राहकांचं समाधानही होते.

हाय-फाय दर्जा

जसे जुन्या काळात उच्चभ्रू माणसं उच्च दर्जा दर्शविण्यासाठी सफेद कपडे घालायचे. तसाच ट्रेण्ड हॉटेल जगातही सुरू झाला. ९० च्या दशकात वेस्ट-इन हॉटेलने प्रथम पांढऱ्या चादरी वापरण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता सगळेच पांढऱ्या चादरी वापरू लागले. यामागचं कारण असं की, पांढऱ्या चादरीमुळे नवीनच सजवलेल्या खोलीसारखा भास होतो.

छुपा फायदा

पांढऱ्या चादरीचा आणखी एक फायदा हा की, बेडरूममधील पांढऱ्या रंगाची थीम बाथरूममध्ये कायम ठेवता येते (टॉवेल व बाथरोबसाठी). रोज चादर व टॉवेल धुण्यासाठी नेल्यावर त्या वेगवेगळ्या न करता एकत्रच मशिनमध्ये टाकता येतात. यात एकमेकांना रंग लागण्याचीही चिंता राहत नाही.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.