Now Reading:
भाऊ, फेब्रुवारीमध्ये २८ दिवसच का असतात?
भाऊ, फेब्रुवारीमध्ये २८ दिवसच का असतात?

यंदा फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस आहेत, पण दर चार वर्षांनी हा महिना २९ दिवसांचा असतो. पण फेब्रुवारीमध्ये २८ दिवसच का असतात याचा विचार अनेकदा तुमच्या मनात नक्कीच डोकावून गेला असेल.

सुरुवातीला एका वर्षात केवळ दहाच महिने. 

रोमचा पहिला राजा रोग्युलस यांनी तयार केलेल्या जुन्या रोमन पंचांगात मार्च ते डिसेंबर असे दहाच महिन्यांचे वर्ष होते. मात्र, त्यानंतर आलेला दुसरा राजा न्यूमा पाँपिलिअस यांनी हे पंचाग अधिक अचूक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने डिसेंबरनंतर फेब्रुवारी आणि जानेवारी हे दोन अधिक महिने सामाविष्ट केले. पुढे सीजरने वर्षाचा प्रारंभ मार्चऐवजी जानेवारीपासून धरण्यास सुरूवात केली आणि फेब्रुवारी हा वर्षाचा दुसरा महिना झाला.

रोमन अंधश्रद्धा

पण, कोणतेही रोमन कॅलेंडर प्राचीन अंधश्रद्धेच्या प्रभावाशिवाय पूर्ण होणारे नव्हतेच. सम संख्या रोमन साम्राज्यासाठी योग्य नाही, त्यामुळे आपत्ती ओढावू शकते, असे काही विद्वानांनी राजाला सांगितले. त्यामुळे न्यूमा पाँपिलिअसने प्रत्येक महिन्यातील दिवसांची संख्या विषम राहिल आणि एका वर्षात ३५५ दिवस असतील अशी कॅलेंडरची रचना करण्याचे ठरवले. मात्र, त्यातही काही त्रुटी होत्या. ३५५ दिवस होण्यासाठी एका तरी महिन्यातील दिवसांची संख्या सम असणे गरजेचे होते. यावर उपाय म्हणून फेब्रुवारीतील दिवसांची संख्या सम करण्यात आली आणि हा २८ दिवसांचा महिना झाला.

कारण या महिन्याला ‘to purify’ असे म्हटले जाते. फेब्रुवारीमध्ये रोमन लोक मृत लोकांशी निगडीत विधी करायचे. ज्या महिन्यात शुद्धीकरण विधी होतात तो महिना आपोआपच शुद्ध होतो अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे या महिन्यात सम संख्या असली तरी त्याचा रोमन साम्राज्यावर परिणाम होणार नाही असा त्यांचा समज होता.

विस्कटलेले कॅलेंडर मार्गावर आणण्यासाठी ऑगस्टस सीजरचा पुढाकार

न्यूमाने तयार कॅलेंडरप्रमाणे फेब्रुवारी वगळता बाकी इतर महिन्यांमध्ये ३१ किंवा २९ दिवस होते. पण या नवीन कॅलेंडरमध्येही अनेक त्रुटी होत्या. ऋतूचक्र बदलत गेल आणि त्याचा परिणाम कॅलेंडरवर झाला परिणामी त्यात बदल करण्यात आले. मात्र, यामुळे लोकांची बरीच धांदल उडू लागली. अखेर, हे विस्कटलेले कॅलेंडर मार्गावर आणण्यासाठी ऑगस्टस सीजरने पुढाकार घेऊन नव्याने कॅलेंडर तयार केले. त्याने इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे सूर्याला डोळ्यासमोर ठेवून कॅलेंडरची रचना केली. गरजेनुसार कॅलेंडरमध्ये १० दिवस अधिक जोडले. त्याचसोबत, कॅलेंडर संतुलित राहावे म्हणून दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एक दिवस अधिकचा असेल अशी आखणी केली.

ग्रेगरियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात २९ तारीख येते तेव्हा ते लीप वर्ष असतं. आता आपण वापरत असलेले ग्रेगरियन कॅलेंडर याच रोमन कॅलेंडरचे आधुनिक रुप आहे.

Input your search keywords and press Enter.