Now Reading:
५ मजेशीर व्हॉट्सअप ग्रुपस ज्यात तुम्ही नक्कीच असाल
५ मजेशीर व्हॉट्सअप ग्रुपस ज्यात तुम्ही नक्कीच असाल
whatsapp, groups

स्मार्टफोनच्या या काळात आपण प्रत्येकाशी रोज न भेटता संवाद साधू शकतो. त्यामुळे अशा मित्र – नातेवाईक मंडळीशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातात. हे ग्रुप सुरुवातीला खूप मजेशीर वाटतात पण नंतर हळूहळू त्यांचा डोक्याला ताप होऊ लागतो. कारण एका ग्रुप आलेला मेसेज दहा ग्रुपवर पुन्हा पुन्हा येत असतो.

बॅक बेंचर-

आता हा ग्रुप तर सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये असेलच. शाळा सोडून बरेच वर्ष झाले तरी या आपल्या मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी हा ग्रुप असतो.

आमची माती आमची माणसं-

हा कोणत्याही शेतकरी मंडळीचा ग्रुप नाही. तर आपल्याला जबरस्तीने या ग्रुपमध्ये अॅड केले जाते. ज्यामध्ये बोलताना दहा वेळा विचार करुन बोलाव लागतं. एकतर यात काही अतिउत्साही नातेवाईक असतात जे काही व्हायरल असेल ते शेअर करत बसतात. 

गुड मॉर्निंग अँड गुड नाईट ग्रुप-

whatsapp, groups

Image Source: Shutterstock

या ग्रुपमध्ये लोक फक्त गुड नाईट आणि गुड मॉर्निंग ऐवढेच मेसेच करतात.

घरोघरी पोरी whatsapp वरी- 

फक्त महिलांसाठीचा ग्रुप शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेनमधल्या सगळ्या महिला आणि मुली या ग्रुपवर असतात.

गोवा प्लॅन ग्रुप-

कित्येक वर्ष कित्येक महिने झाले असतील हा ग्रुप बनवून पण अजून तो गोवाचा प्लॅन ग्रुप तसाच आहे. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये हा ग्रुप नक्कीच असेल.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.