Now Reading:
तुम्हाला झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा खरा अर्थ
तुम्हाला झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचा खरा अर्थ

आपल्या आयुष्यातील सर्वात गूढ आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे झोपेत पडणारी स्वप्नं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला रहस्यमय, भयानक किंवा मनोरंजक स्वप्नं पडतात. स्वप्नांबदद्ल अनेक समजूती असतात पण या समजूती किती खऱ्या-खोट्या ते कोणालाच सांगता येत नाही. झोपेत पडणारी स्वप्नं आपल्या नेहमीच्या आयुष्याशी निगडीत असतात किंवा अनुभवांवर आधारित असतात. प्रत्येक स्वप्न आपल्याला स्वतः बद्दलची काहीतरी जाणीव करून देत असतं.

तर, तुमची स्वप्नं तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत?

पहिली गोष्ट म्हणजे तुमची स्वप्नं तुम्हाला दोन गोष्टी सांगत असतात:

१. तुम्हाला नक्की काय हवंय?

जेव्हा तुम्हाला नवीन घर, गाडी विकत घेत असल्याचं स्वप्न पडत, किंवा तुम्हाला हवा तासा जोडीदार मिळाला आहे अशी स्वप्ने पडतात तेव्हा तुम्हाला ही स्वप्ने आयुष्यात काय हवंय ते सांगत असतात.

२. तुम्हाला कोणती गोष्ट नको आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते 

स्वप्नं तुम्हाला तुमच्या भीतीचीसुद्धा जाणीव करून देत असतात. बहुतेक वेळा आपल्याला पडलेली स्वप्न आठवत नाहीत. परंतु ती स्वप्नं पाहिल्यानंतर आपल्याला कोणती भावना जाणवली ते नेहमी लक्षात राहत.

स्वप्नातील संदेश कसा समजावा?

कधी कधी आपल्याला स्वतःच्या इच्छांची आणि भीती असलेल्या गोष्टींची जाणीव नसते. तेव्हा अशी स्वप्नं स्वतःला जाणण्यास कामी येतात. पण जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमचं मन जागच असतं आणि तुमच्या मनातील भीती आणि इच्छा नजरेसमोर येतात. तुम्ही बरोबर मार्गावर आहात की चुकीच्या हे तुम्हाला स्वप्नांद्वारे समजण्यात मदत होते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.