Now Reading:
फिक्स डिपॉझिट म्हणजे काय?
फिक्स डिपॉझिट म्हणजे काय?
fixed deposit

वेगवेगळ्या योजनांचा लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यात मिळावा, भ्रष्टाचार नाहिसा व्हावा, म्हणून सरकारने आपल्याला बँक खाते उघडून दिले. पण, या बँक खात्याचा वापर केवळ पैसे साठवण्यासाठी नाही, तर ते वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. ‘फिक्स डिपॉझिट’ Fixed Deposit म्हणजे ‘जमा ठेव’ची सुविधा बँक तुम्हाला उपलब्ध करून देते. त्याचा फायदा करून घेणं महत्त्वाचं आहे.

फिक्स डिपॉझिट कोण काढू शकतं?

ज्यांच्याकडे बँक खाते आहे, अशी कोणतीही व्यक्ती फिक्स डिपॉझिट काढू शकते. यासाठी पुन्हा नव्याने खातं उघडण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा अर्ज करावा लागतो.

फिक्स डिपॉझिट का काढावं?

तुमच्या घरी जमलेले पैसे तुम्ही बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवू शकता. या रक्कमेवर बँक तुम्हाला ठराविक व्याज देते. समजा माझ्याकडे पाच हजार रुपये आहेत आणि पुढील पाच वर्षांसाठी ते फिक्स डीिपॉझिट म्हणून ठेवले तर, बँक तुम्हाला तुमचे पाच हजार रुपये पाच वर्षांनी व्याजासकट परत करते.

हे व्याज किती असतं?

फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्ही कितीही रक्कम आणि कितीही काळासाठी ठेवू शकता. त्यावर मिळणारे व्याज तुम्ही किती रक्कम ठेवता आणि किती वेळासाठी ठेवत आहात यावर अवलंबून आहे. 

Cover Image Source: Unsplash

Input your search keywords and press Enter.