Now Reading:
ब्रेड खाणे बंद करणे आरोग्यास अपायकारक!
ब्रेड खाणे बंद करणे आरोग्यास अपायकारक!

वजन कमी करण्यासाठी तुम्ही संतुलित आहाराचं पालन करत असता तेव्हा तुमचा नाश्ता कशा प्रकारचा असतो? कदाचित काही अंडी, फळे किंवा धान्ये? पण,अर्थातच ब्रेड नाही. ब्रेडपासून तयार करण्यात आलेले पदार्थ जिभेला कितीही चविष्ट लागले तरी पिठाचे पदार्थ म्हणजे ‘कार्ब्स’चे भांडार. पण, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, ब्रेडला आहारातून संपूर्णपणे वगळणं देखील चुकीचे आहे. आहारातून ब्रेड पूर्णपणे वर्ज्य करून तुम्ही शरीराच नुकसान करताय हे तुम्हाला ठाऊक आहे का? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत!

खरंतर तुमचं वजन कमी होत नसतं

जर तुम्ही महिनाभर ब्रेड खाणं सोडून दिलत आणि एका महिन्याने तुमचं वजन करून पाहिलंत तर तुम्हाला वजन कमी झाल्याचे पाहून आनंद होईल. पण, जास्त खूश होण्याची गरज नाही कारण त्यावेळी तुमच्या शरीरातील केवळ पाण्याचे प्रमाण कमी झालेले असेल, कार्ब्स (carbs) नाही. वजन कमी करण्यासाठी कार्ब्स कमी करणे गरजेचे असले तरी त्याचे एक विशिष्ट परिमाण असते.

शरीरातील ऊर्जा कमी होणे

धान्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असून, ते शरीराला गरजेचे असतात. शरीरातील ऊर्जा कायम राखण्यासाठी धान्यापासून बनलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. कार्ब्स कमी करण्याच्या नादात अनेक जण त्यांच्या आहारात महत्त्वाच्या पदार्थांचा समावेश करण्यास विसरतात. कार्ब्स हे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतात. आधीच शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते त्यात आहारात चुकीचे बदल केल्याने अंगात उरलीसुरली असलेली ऊर्जाही कमी होते आणि थकवा जाणवण्यास सुरुवात होते.

स्ट्रोक आणि इतर हृदयरोग

हे खरं आहे की शरीरात कार्ब्सच प्रमाण जास्त असल्याने वजन वाढत पण याचा अर्थ असा होत नाही की आहारातून कार्ब्स पूर्णपणे वगळले पाहिजे. डॉक्टर्सच म्हणणं आहे की, ब्रेडमध्ये असलेली धान्य मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि स्ट्रोक होण्याची शक्यता कमी करतं.

आपल्या मेंदूचा मुख्य ऊर्जास्त्रोत असलेले कार्ब्स सुदृढ आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे एव्हाना तुम्हाला कळलेच असेल.

Image Souce: Shutterstock

Input your search keywords and press Enter.