Now Reading:
या ५ साध्या गोष्टींतून आपल्या मुलीसाठी एक बाप म्हणून व्हा तिचा आधारस्तंभ
या ५ साध्या गोष्टींतून आपल्या मुलीसाठी एक बाप म्हणून व्हा तिचा आधारस्तंभ

एका बापासाठी मुलीचं सुख हे सर्वोत्तम सुख असतं. आणि बऱ्याचदा संकटात असताना तिच्या ‘BFF’ पेक्षा तिला तिचा बाबा हवा असतो. म्हणूनच तुमच्या मुलीच्या सक्षमीकरणासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या आणि व्हा ‘सुपरडॅड’!

१. तुझ्यात काहीही करण्याची क्षमता आहे-

एक वडील म्हणून तुमच्या मुलीशी संवाद साधताना तिला सांगा की, तिच्यासमोर संपूर्ण जग उभं आहे आणि जगातील कोणतीच गोष्ट तिच्या आवाक्याबाहेर नाही. आणि हेच तिच्या स्वतंत्र व सक्षम प्रवासाचं पहिलं पाऊल होईल.

२. तिच्याशी प्रसिद्ध व यशस्वी महिलांबद्दल चर्चा करा-

Father daughter

मुलींसाठी हे महत्त्वाचं असतं की, त्यांच्या वडिलांच्या नजरेत महिलांचे काय स्थान आहे. आपल्या बोलण्यात वारंवार यशस्वी डॉक्टर, वैज्ञानिक, राजकारणी आणि इतर क्षेत्रातील यशस्वी महिलांचा उल्लेख असू द्या.

३. स्वातंत्र्य-

तुमच्या मुलीला नवीन जबाबदाऱ्या आणि आव्हाने स्वीकारायला प्रोत्साहन द्या. मोजमाप करून जोखीम घ्यायचं स्वातंत्र्य द्या. कदाचित घरचा व्यवहार सांभाळायची जबाबदारीही तिच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.

४. स्वतःचं मत-

Father daughter

तिला जगू द्या, अनुभव घेऊ द्या. कारण अनुभवातूनच माणूस स्वतःची मतं तयार करतो. तिला क्रिएटिव्हिटीची कास धरू द्या. कारण काहीतरी नवीन करताना काहीतरी चुकीचं घडतंच आणि याच चुकांतून एक सक्षम व्यक्तिमत्व तयार होते.

५. घरापासूनच सुरु करा समान वागणूक-

एक वडील म्हणून घरातील छोट्या मोठ्या कामांत हातभार लावा. ज्यातून तुम्ही तुमच्या मुलीसमोर एक समान वागणुकीचे उदाहरण ठेवता व तिला हे ‘मुलांचं काम’ आहे हे ‘मुलींचं काम’ आहे आदी बंधनांतून मुक्त करता.

 

Input your search keywords and press Enter.