Now Reading:
ग्रामीण भागातील फिरती आरोग्य केंद्रे
ग्रामीण भागातील फिरती आरोग्य केंद्रे
Virtual Healthcare Vans

भारतात वैद्यकीय व तांत्रिक क्षेत्रामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात असलेले अंतर मिटवण्यासाठी Virtual Healthcare Vans ने पुढचे पाऊल उचलले आहे. ‘व्हर्च्युअल हेल्थकेअर व्हॅन’ म्हणजेच ‘फिरती आरोग्य केंद्रे’. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची कमतरता असल्याने फिरत्या आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरवण्याचा निश्चय केला गेला.

शारीरिक तपासणीसाठी ग्रामीण भागातील रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक सहसा शहरातील डॉक्टरांना भेट देऊ शकत नाहीत. याचं पहिलं कारण हे की, योग्य शिक्षण नसल्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, आणि दुसरं कारण म्हणजे उपचारासाठी शहरात येण्याकरिता वैद्यकीय खर्चाबरोबरच वाहतुकीचा खर्च पण होतो. त्यामुळे पैसे खर्च करण्याच्या चिंतेने ग्रामीण लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

एका कंपनीने या समस्येला गंभीरपणे हाताळून यावर मार्ग शोधला. ही परिस्थिती बदलण्याच्या इच्छिने ‘क्रीसेन्डो कॉर्पोरेशन’ने २०१२ साली पहिल्या फिरत्या आरोग्य सेवेची निर्मिती केली. प्रगत तंत्रज्ञान आणि विविध वैद्यकीय उत्पादने या व्हॅन्समध्ये वापरली जातात. क्रीसेन्डो कॉर्पोरेशनने जून २०१३मध्ये त्यांची दुसरी व्हॅन लॉन्च केली. या दुसऱ्या प्रकल्पाच नाव “अनन्या” ठेवण्यात आलं. अनन्या अपंग रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्याचं काम करते.

या फिरत्या आरोग्य पथकाद्वारे लोकांच्या दारापाशी वैद्यकीय सुविधा पोहोचल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

All images have been taken from Better India

Input your search keywords and press Enter.