Now Reading:
८० वर्षीय अनोखी शाकाहारी मगर; केरळातील मंदिराची करतेय राखण
८० वर्षीय अनोखी शाकाहारी मगर; केरळातील मंदिराची करतेय राखण

भारतात अनोख्या कथांची काही कमी नाही. अशीच एक कथा केरळच्या अनाथपुरा मंदिराच्या तलावातील मगरीची आहे.

कासारगोड, केरळ येथील अनंतपूर तळे मंदिराच्या परिसरात नेहमी एक मगर वास्तव्य करते. येथे मगर मरण पावल्यावर, दुसरी मगर स्वतःहून त्या परिसरात येते. परंतु ती कुठून आणि कशी येते हे कोणालाच ठाऊक नाही. कारण या परिसराच्या आसपास कोणतीही नदी किंवा तळे नाही. असेच या परिसरात ६० वर्षांपासून वास्तव्य करत असलेली एक मगर आहे, जिचे नाव आहे ‘बबिया’.

६० वर्षांपासून वास्तव्य करत असलेली एक मगर,‘बबिया’. या मगरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शाकाहारी आहे.

या मगरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शाकाहारी आहे. म्हणजेच ती कोणत्याही प्राण्याला मारून खात नाही. या मंदिराच्या तलावातील मासे या मगरीला घाबरत नाहीत. ती शाकाहारी असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचा मासा आवडत नाही. ती फक्त मंदिरातून मिळालेला प्रसाद खाते. प्रसादात ‘भात आणि गूळ’ असतो. प्रत्येक आरतीनंतर हा प्रसाद या मगरीला दिला जातो. असंसुद्धा म्हटले जाते की जे कोणी भाग्यशाली आहेत फक्त त्यांनाच ही मगर दिसते.

अशी ही निसर्गाच्या नियमांच्या विरुध्द असलेली मगर अद्भुतच आहे.

Cover Image Source

 

Input your search keywords and press Enter.