Now Reading:
२ मित्रांनी नेला मुंबईचा वडा पाव London मध्ये; ४ कोटींचा नफा!
२ मित्रांनी नेला मुंबईचा वडा पाव London मध्ये; ४ कोटींचा नफा!

वडा पाव नावतच सगळं काही आलं. वडा पावविषयी जास्त काही माहिती सांगण्याची गरज नाही. वडा पाव म्हणजे सगळ्या मुंबईकरांचा जीव की प्राण. पण हा वडा पाव केवळ मुंबईतच नव्हे तर आता थेट (London) लंडनच्या रस्त्यावर मिळू लागला आहे. आणि तेथील top (टॉप) १० इंडियन फूडमध्ये त्याचा समावेश झाला आहे. तेही मुंबईत वाढलेले दोन तरुण सुजय सोहनी आणि सुबोध जोशी यांच्यामुळे.

२००७ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात सुजय सोहनीची नोकरी गेली. त्यानंतर रोजगारासाठी त्यांच्याकडे इतर काही पर्याय उरला नव्हता. मग सुबोध आणि सुजय या जोडीने लंडनमध्ये आपल्या मायदेशातील प्रसिद्ध पदार्थ विकण्याचा निर्णय घेतला. सुजयने लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी केली होती. त्यामुळे त्याला हॉटेल व्यवसायाशी निगडीत गोष्टींचा अनुभव होता. या दोन भारतीयांनी लंडनच्या रस्त्यावर वडापाव आणि दाबेली विकायला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या या व्यवसायाला चांगले यश मिळू लागले.

लंडनच्या गोऱ्या लोकांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या पदार्थांची हवा होऊ लागली.

त्यांनी लंडनमध्ये श्री. कृष्णा वडापाव हॉटेल सुरु केले. आपल्या मातृभूमीच्या पदार्थांना प्रसिद्धी मिळू लागल्यामुळे त्यांनी लंडनमध्ये दुसरे हॉटेल सुरु केले. त्यामध्ये ६० पेक्षा जास्त भारतीय स्ट्रीटफूड पदार्थ मिळतात. आणि श्रीकृष्ण वडापावचे वार्षिक उत्पन्न हे ४ कोटी ऐवढे आहे.

सामान्य कष्टकरांच्या रोजगाराचा साधन असलेला वडा पाव परदेशातही आपली ओळख तयार करत आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.