Now Reading:
५ सिनेमे ज्यामुळे आपण उर्मिला मातोंडकरचे फॅन झालो
५ सिनेमे ज्यामुळे आपण उर्मिला मातोंडकरचे फॅन झालो

१९८० मध्ये झाकोळ या मराठी सिनेमातून सिनेमासृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलेली उर्मिला मातोंडकर. नंतर हिंदी सिनेमातून अनेक सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. पण तिने कधीही नाविन्याची कास सोडली नाही. स्वतःला कधीही एकाच साच्यात जखडून ठेवलं नाही. म्हणूनच घेऊन आलोय असे ५ सिनेमे ज्यांनी तिला बॉलिवूड ‘सिने आयकॉन’ केले.

१.रंगीला (१९९५)

 

‘रंगीला’मधली मुंबईच्या चाळीत वाढलेली मिली. तिच्या सौंदर्याने तिने सगळ्यांनाच झपाटून सोडलं. ‘याय रे याय रे’ मधील तिची डान्स स्टेप आजही हिट आहे. तिनेच देशभरातल्या मुलींना मोठमोठी स्वप्न पाहायला व ती साकार करायला शिकवले.

आणि हो! बहुतेक सगळेच मान्य करतील की ती आपलं ‘चाइल्डहूड’ क्रश होती!

२. सत्या (१९९८)  

‘सत्या’मधील विद्या. सत्याच्या शेजारी राहणारी ही सालस साधी भोळी मुलगी जिला गायिका व्हायचं असतं. तिच्या ह्या अवताराने समीक्षकांना भलतंच अचंबित केलं. म्हणजे एका क्षणी ही एक स्मार्ट व सेक्सी (दौड) मुलगी म्हणून पडद्यावर येते आणि दुसऱ्याच क्षणी एका सोज्वळ मुलीच्या अवतारात प्रेक्षकांना खिळवून ठेवते.. तिच्या या हरहुन्नरी अदाकारीने सगळेच उर्मिलाचे फॅन झाले.

३. कौन (१९९९)

राम गोपाल वर्मा यांची ही एक कल्ट फिल्म.! यात एक निनावी पात्र सादर करणारी उर्मिला शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीशी खिळून ठेवते. तिचे भोळसट भाव, तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि सिनेमाचा क्लायमॅक्स आपल्याला तीन ताड उडवून टाकतो. भारतीय सिनेमामधील ही एक मस्ट वॉच फिल्म आहे!

४. भूत (२००३)

एका भुताने झपाटलेल्या महिलेची भूमिका साकारताना उर्मिला प्रेक्षकांना इतके भंडावून सोडते की, प्रश्न पडतो की सिनेमाघरातून जिवंत बाहेर पडू कि नाही. या सिनेमासाठी उर्मिलाने त्या वर्षीचा क्रिटिक्स चॉईस बेस्ट एक्टरेसचा फिल्मफेअर पटकावला.

५. मैने गांधी को नहीं मारा (२००५)

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारसा चालला नाही. पण या सिनेमासाठी उर्मिलाला बॉलिवूड मूवी अवॉर्ड-बेस्ट अॅक्टरेस हा पुरस्कार मिळाला.

Input your search keywords and press Enter.