Now Reading:
केस कर्ल करण्याचे अनोखे प्रकार
केस कर्ल करण्याचे अनोखे प्रकार

केसांच्या अनेक तऱ्हा असतात. जशी माणसं तसे केस. सरळ, कुरळे, गुंतलेले आणि अजून बऱ्याच प्रकारचे. आज तुम्हाला आम्ही केस कर्ल करायला शिकवणार आहोत आणि तेही कर्लरचा वापर केल्याविना!

 

नुसतं पाणी वापरून-

तुमच्या केसांना दोन भागात विभागून घ्या. त्यावर पाणी शिंपडा. त्यानंतर कपाळावरील केस मागच्या बाजूने दुमडा. असं करत करत एका बाजूचे संपूर्ण केस दुमडा. मग पिन लावून हे केस डोक्याच्या पाठीमागे अडकवून घ्या. आता दुसऱ्या बाजूचे केस पण तसेच गुंडाळून घ्या. रात्रभर हे केस असेच राहू द्या आणि सकाळी केस सोडा. तुमच्या केसातील कर्ल्स पाहण्यासारख्या असतील!

 

सॉक्स वापरून-

ह्या प्रकारे केस कर्ल करणं जरा अजब वाटू शकत पण एकदा करून पाहिल्यावर तुम्हाला हा मार्ग सोपा वाटेल आणि कामी येईल. सगळ्यात आधी केस नीट विंचरून घ्या. मग केसांना ४ भागात विभागून प्रत्येक भाग सॉक्समध्ये गोल गुंडाळून बांधून घ्या. त्यानंतर रात्रभर केस असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी केस सोडा. तुम्हाचे हे कर्ल्स अगदी सुंदर आणि नैसर्गिक दिसतील.

Input your search keywords and press Enter.