Now Reading:
समजून घ्या रजोनिवृत्तीला; घ्या स्वतःची काळजी
समजून घ्या रजोनिवृत्तीला; घ्या स्वतःची काळजी

दुर्दैवाने, लैंगिक आरोग्यांसारख्या संवेदनशील गोष्टींबाबत भारतात सहसा चर्चा केली जात नाही. पण इतर आरोग्यांच्या विषया सारखा, हा ही विषय तितकाच महत्त्वाचा आहे.  

स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होत असतात, तसाच एक नैसर्गिक बदल असतो तो म्हणजे रजोनिवृत्तीचा. यामुळे महिलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल होतात. या काळात तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच रजोनिवृत्तीच्या विषयावर चर्चा करणं शरमेची बाब नसून ते गरजेचे आहे.

 

रजोनिवृत्तीची लक्षणे अश्या प्रकारे दिसून येतील:

१. शरीरातून गरम वाफा येणं

२. रात्रीच्या वेळेस अंग घामेजणं

३. अनियमित पाळी येणे

४. कमी झालेली कामोत्तेजना

५. मूड स्विंग्स होणं 

 

ही सगळी लक्षणे दिसून आली की, समजायचं रजोनिवृत्ती जवळ येतं आहे. ४० ते ५० वयोगटातील महिलांनी या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे.  

रजोनिवृत्ती म्हणजे स्त्री जीवनातील पुनरुत्पादक अवस्थेच्या काळाची समाप्ती. या काळात तुमची मासिक पाळी थांबेल. ही एक नैसर्गिक क्रिया असून, याला एखाद्या रोगाप्रमाणे बघणं अगदी चुकीचं आहे. तसेच, अधिक माहितीसाठी स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेणेही गरजेचे आहे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.