Now Reading:
तुम्हाला रोजच्या बसमध्ये पाहायला मिळतील हे ५ प्रकारचे सहप्रवासी
तुम्हाला रोजच्या बसमध्ये पाहायला मिळतील हे ५ प्रकारचे सहप्रवासी

एस.टी./खासगी बसमधून प्रवास करताना वेगवेगळ्या अवली स्वभावाचे लोक नेहमीच नजरेखालून जातात. काही खूप चांगले, तर काही खूप भयंकर स्वरूपाचे अनुभव देवून जातात. चला मग पाहूया, अशा नेहमीच्या सहप्रवाशांचे ५ अतरंगी प्रकार:

१. कटकटी  तक्रारखोर

Image Source: Giphy

सारखी चिडचिड आणि रडारड करणारे प्रवासी नेहमीच गाडीत भेटतात. ते कंडक्टरसोबत चिल्लरसाठी रडताना दिसतील. उगाचच एखाद्याशी वाद घालताना दिसतील. यांपासून सर्वांनाच काही सीट सोडून बसण्यास आवडते.

२. भोकाड पसरणारी मुले

बहुतेकदा एखादे कुटुंब आपल्या सर्व लवाजम्यासह प्रवासाला निघते. यात एखादे क्युट दिसणारे छोटे मुल रडू लागले की ते केव्हा शांत बसेल याची भविष्यवाणी करणे खुद्द ब्रम्हदेवालाही शक्य नाही.

३. ओरडत बोलणारे

बसच्या एवढ्या मोठ्या प्रचंड आवाजात काही प्रवाशांना मोठमोठ्याने फोनवर ओरडून बोलण्याची सवय असते. त्यांच्या पहिल्या ‘हॅलो’ बोलण्यानेच कानठळी बसून जाते. पुढे त्यांची ही संभाषणरुपी ओरड, मोबाइलचे नेटवर्क जाईपर्यंत साऱ्या बसला सोसावी लागते.

४. नुसते खादाड

bus passengers, types of people, BEST bus

Image Source: India.com

काही जणांना तोंडात काही न टाकता सीटवर गप्प बसणे जमतच नाही. सारखं काही ना काही चघळत बसायची सवय असते. खाल्ल्यावर कागद सीटखाली टाका, खिडकीबाहेर फेका हे नेहमीचेच आहे.

५. जबरदस्तीचा मित्र

खूप जणांना कोणीतरी बाजूच्या सीटवर बोलायला असल्यावर हायसे वाटते. असे फारच बोलके प्रवासी डोक्याला घाण शॉट देवून जातात. गावाच्या ओळखीवरून राजकारणापासून सुरु झालेल्या चांभार चौकश्या कधी एकदा संपतात, याच्याच चिंतेत प्रवास आटपून जाते.

Cover Image Source: SccopWhoop

Input your search keywords and press Enter.