Now Reading:
प्रत्येक ग्रुपमध्ये असतात हे ५ प्रकारचे मित्र; पाहा तुमचा कोणता मित्र आहे या यादीत.
प्रत्येक ग्रुपमध्ये असतात हे ५ प्रकारचे मित्र; पाहा तुमचा कोणता मित्र आहे या यादीत.

तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेडे, सुशील, प्रेमळ, अतरंगी प्रकारचे मित्र बनवले असतील. पण हे ५ मित्र तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये सापडतीलच. 

1. (All time online) ऑल टाईम ऑनलाइन मित्र- 

आपल्या प्रत्येकाच्या ग्रुपला कनेक्ट करणारा एक मित्र किंवा मैत्रिण असते. काही होऊ दे जग उलथापलथ होऊ दे हे लोक नेहमी सगळ्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही ती मैत्रिण लग्न झालेली असेल तर ती बिचारी आपला संसार आणि सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आपल्याला यार असे लोक खूप आवडतात, जे सगळ्यात आधी मैत्रीच्या नात्याला जपतात.

2. Happy (हॅपी) माणूस- 

Image Source

आपला एखादा तरी मित्र किंवा मैत्रिण असते जे कुणासोबत काही चांगले झाले तरी हा भाऊ एकदम खूश. आपल्या ग्रुपमधला जिगरी मित्र असतो. लोकांच्या सुखावर जळणारे खूप असतात पण हे लोक लोकांच्या सुखात आपलं सुख समजतात.

3. Show-off (शो-ऑफ) भाई

बडे बाप का बेटा… असा मित्र तर आपल्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतोच. याची गोष्ट वेगळी असते. आयफोनपासून ते ब्रॅण्डेड गोष्टी या मित्राकडे असतात. या भाईच्या जीवावर ग्रुपचा बजेट ठरलेला असतो. 

4. सदैव दुखी आत्मा-

Image Source

अरे हा माणूस म्हणजे अश्रुंचा महापूर असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक सेंटी मित्र असतो. लहानश्या गोष्टींवरही हा मित्र लगेच इमोशनल होत असतो.

5. Secret Keeper (सिक्रेट किपर)-

आयुष्यात एक मित्र किंवा मैत्रिण अशी असते ज्याला ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीचे गुपित माहित असते. या माणसाच्या जवळ सगळे आपल मन मोकळं करत असतात. 

यारो की दुनियादारी.

टॅग करा तुमच्या ग्रुपमधील अशा मित्राला.

Input your search keywords and press Enter.