Now Reading:
घरच्या लग्नसमारंभात वावरणाऱ्या ५ तऱ्हेच्या काकू
घरच्या लग्नसमारंभात वावरणाऱ्या ५ तऱ्हेच्या काकू
typical indian aunties, nosy relatives

महाराष्ट्रात ‘जॉइंट फॅमिली’ची कल्पना सगळीकडे आढळते. बर्थडे पार्टी, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाला सर्वच नातेवाईक आवडीने येतात. यांमध्ये आपल्या इथल्या तिथल्या काकू तर हक्काने उपस्थित असतात. तसे त्यांच्या स्वभावाचे प्रकार ही अनेक आहेत.

१. संस्कारी

घरापासून सगळीकडच्या पूजापाठांत या काकूला फार आवड असते. देवावर तिची विलक्षण श्रद्धा असते. थोडी बोरिंग वाटली तरी देवाकडे सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा करते.

२. Strict (स्ट्रीक्ट)  

कडक शिस्तीच्या या काकूपासून सर्वजण काही हात दूर राहणेच पसंत करतात. साध्या साध्या गोष्टीत काही ना काही आदेश सोडणे हा तिचा गुणधर्म.

३. Filmy (फिल्मी)

सर्व सिरियल्स, सिनेमे पाहणाऱ्या या फिल्मी काकूच्या बोलण्यात नेहमीच टीव्हीमधील पात्रांचा उल्लेख असतो. तेच तेच डायलॉग मारत ही काकू आसपास मजेशीर वातावरण निर्माण करते आणि आपणही त्यांच्या विषयात सहभागी होऊन जातो.

४. नाक खुपसणारी

घरात, शेजारी, आसपासच्या प्रत्येक मुद्द्यात नाक खुपसणाऱ्या या काकूला गरज नसताना मत मांडायची सवय असते. ती कधीही कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घेऊ शकते. चांगल्या गोष्टीत या काकूचे नक्की काय मत असेल याची सर्वांनाच धास्ती असते.

५. CCTV Aunty सीसीटीव्ही

सहसा ही काकू काही बोलायची नाही. दूरूनच तुमच्यावर लक्ष ठेवेल. तोंडावर न बोलता मागून सर्वांकडे तुमच्या दैनंदिन हिशोबाची चर्चा करेल. एखादी व्यक्ती कुठे, कधी, केव्हा जाते, कोण कुठे जात नाही अशी सर्व माहिती तिने सिसिटीव्ही कॅमेऱ्याशिवाय हेरलेली असते.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.