Now Reading:
८ प्रकारची मुले ज्यांना तुम्ही आयुष्यात भेटलात असाल
८ प्रकारची मुले ज्यांना तुम्ही आयुष्यात भेटलात असाल
Marathi boys, maharashtrians, mulga

महाराष्ट्र जसा वेगवेगळ्या भौगोलिक पट्ट्यांमध्ये विखुरलेला आहे. त्याचप्रमाणे मराठी लोकांचे ही निरनिराळे स्वभाव आहेत. इथला मराठी तरूण जेवढा प्रभावी, बाणेदार, खोडकळ, मैत्रीपूर्ण तेवढाच तो मजेशीरसुद्धा. चला मग पाहुया अशा मराठी तरुणांचे काही विशेष प्रकार.

१. आदर्श मुलगा

ही आहे आदर्श मराठी तरुणांची कॅटेगरी. सुशिक्षित, चांगली नोकरी करणारे आणि सर्व कामे चोख वेळेवर पूर्ण करणारे हे तरुण सर्वांचेच लाडके असतात.

२. अतिउत्साही मुलगा

मराठी मित्रांचा मैत्रिणींचा ग्रुप म्हणजे फुल टाइमपास. प्रत्येक ग्रुपमध्ये असा कोणीतरी असतो जो सगळे प्लॅन्स करतो. हाच तरुण सगळ्यात उत्साही असतो. प्रत्येक कामात तोच पुढे असतो. व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिनही हाच तरुण असतो. सर्व मित्र मैत्रिणींना सांभाळून घेऊन पूर्ण ग्रुप टिकविण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असतो.

३. खेळाडू मुलगा

हे तरुण क्रिकेट, फुटबॉल खेळण्याचे फार वेडे असतात. प्रत्येक जुन्या चालू सामन्याची डीटेल माहिती यांकडूनच घ्यावी. असे हे तरुण नेहमीच स्पोर्ट्स जर्सी घालून फिरताना दिसतील.

४. हळवा मुलगा

या प्रकारातील तरुण मनाने फार हळवे असतात. कोणीही जराही वाईट बोलले की त्यांच्या मनाला खूप लागते. एखाद्या मुलीच्या प्रेमात लगेच पडतील आणि सर्व वेळ तिच्याच विचारात घालवतील.

५. शांत मुलगा

ही मराठी मुले इतरांपेक्षा थोडे कमी बोलणारी असतात. आपले बरोबर आहे का, आपण कुठेतरी चुकत तर नाही ना असे अनेक स्वतःबद्दलचे न्यूनगंड त्यांच्या मनात नेहमीच असतात. एखादी गोष्ट चोख बजावण्याची ताकत असली तरी स्वतःला इतरांपेक्षा कमी आखतात.

६. बोल बच्चन मुलगा

प्रत्येक गोष्ट चान्स मिळताच हवेत उडवणारी ही मुलं काही कमी नाहीत. आपण यांना बंडलबाज, फेकू असे म्हणतो. गरज नसताना उगाचच स्वतःचे जास्त कौतुक करून एखाद्याचा पूर्ण बिमोड करून टाकतात.

७. उधळ्या मुलगा

काहींना आपण खूप पैसे कमवितो आणि खर्चही करतो हे दाखविण्याची फार हौस असते. असे तरुण पैशाचा शो ऑफ करतील. पूर्ण शरीरभर सोन्याचे दागिने घालून मिरवतील. मंडळांच्या कार्यक्रमात सर्वात जास्त देणग्या देतील. हे लोक मेहनतीने पैसे कमवितात ही एक दुसरी बाजू आहे.

८. वैचारिक मुलगा

एखाद्या गोष्टीचा वेगळ्या पैलूने विचार करणारे वैचारिक मराठी तरुणसुद्धा महाराष्ट्रात कमी नाहीत. यांना चांगल्या वाचनाची, लिखाणाची आणि सतत काहीतरी वेगळे करण्याची आस असते. असे तरुण निरनिराळ्या क्षेत्रात नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे काम करून आपली एक विशेष ओळख निर्माण करतात.

Cover Image Source: Pixabay

Input your search keywords and press Enter.