Now Reading:
महिलांच्या जीवनशैलीतील बदलामुळे होणारे ४ प्रमुख विकार
महिलांच्या जीवनशैलीतील बदलामुळे होणारे ४ प्रमुख विकार

महिलांच्या आयुष्यात नवनवीन टप्पे येत असतात. त्यासोबत त्यांच्या जीवनशैलीत बदल घडत असतात. परिणामी त्या निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकतात. आज जाणून घेऊ महिलांमध्ये सर्वात प्रामुख्याने आढळणाऱ्या काही आजारांबद्दल.

स्तनाचा कर्करोग

स्त्रियांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढतच चाललंय, विशेषतः स्तनाच्या कर्करोगाचं! या कर्करोगाची लागण नेमकी कशामुळे होते याचे निदान करण्यास संशोधकांना अपयश येत असल्याने ही समस्या महिलांसाठी आणखीणच किचकट होऊन बसलीय. पण याच्या मुळाशी महिलांच्या जीवनशैलीतील बदल कारणीभूत आहे एवढं नक्की. यासोबतच उशीराने झालेलं पहिलं मूल, कमी स्तनपान, अतिलठ्ठपणा, अनुवांशिक दोष हे सुद्धा स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात.

नियमित तपासणी कर्करोगाचं सुरुवातीलाच निदान करण्यास मदत करते. व्यायाम, पोषक आहार, फळाहार कर्करोगास दूर राखण्यास मदत करतात.

हृदयविकाराचा झटका

मधुमेह, उच्च रक्तदाब ही हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे आहेत. तसेच फास्ट फूड, कसरतीचा अभाव, कामाचा ताण, आहारावर नियंत्रण नसणे यासारख्या छोट्या छोट्या सवयींनी हृदयाला अपाय होत असतो. तसेच बहुतेक गृहिणींच्या बाबतीत असे घडते की, बहुतेकदा त्यांचं इतर कामांमुळे आरोग्य आणि आहाराकडे दुर्लक्ष होतं. तर दुसरीकडे कामावर जाणाऱ्या महिलांची घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना आरोग्याची ओढाताण होत असते.

उच्च रक्तदाबावर आळा घालण्यासाठी संतुलित आहार, कसरत, औषधोपचार करता येतात. तसेच नियमित तपासणी केल्याने हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत होते. 

गर्भाशयाचे विकार

गर्भाशयाच्या विकारांचे प्रमाणही आजकाल झपाट्याने वाढतंय. १२ ते ४५ वयोगटातील जवळपास ५ ते १० टक्के महिलांना या विकारांनी ग्रासलंय. यामध्ये अंडाशयालगतच्या भागात अनैसर्गिक मांसल वाढ झाल्याचे दिसते.

अनियमित मासिक पाळी, केसगळती, वजनात अचानक झालेली वाढ ही गर्भाशयाच्या विकाराची लक्षणे आहेत. यावर योग्य उपचार केल्याने महिलांची गर्भधारण क्षमता सुधारते.

वजन वाढणे

लग्नानंतर महिलांचं वजन वाढतं असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्याचे मुख्य कारण हे असतं की लग्नानंतर सहसा स्त्रिया आनंदी असतात. सगळे त्यांच्या लहानसहान गरजांकडे लक्ष देत असतात त्यामुळे शरिरात असे हार्मोन उत्पन्न होत असतात ज्यामुळे वजन वाढते.

वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास नियमित व्यायामाची व संतुलित आहाराची गरज असते.

Input your search keywords and press Enter.