Now Reading:
मिसळवेड्या पोटोबांसाठी महाराष्ट्रातील ५ स्पेशल अड्डे जे तुम्ही हमखास करायला हवे ट्राय
मिसळवेड्या पोटोबांसाठी महाराष्ट्रातील ५ स्पेशल अड्डे जे तुम्ही हमखास करायला हवे ट्राय
misal pav, maharashtrian food

झणझणीत… लज्जतदार मिसळ म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण! तशी मसालेदार तर्री आणि चमचमीत मिसळ महाराष्ट्रात सर्वत्र मिळते. पण आज आपण पाहू महाराष्ट्रातील ५ अशी भन्नाट मिसळ केंद्र जिथे लज्जतदार मिसळ मिळते-

१. आस्वाद, दादर-

आस्वाद या नावातच सगळं काही आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेली ही मिसळ मुंबईतील दादर येथे मिळते. इथला झणझणीत रस्सा खऱ्या अर्थाने जिभेचे चोचले पुरवतो. ही मिसळ खाण्यासाठी अगदी दादर स्टेशनसारखी लोकांची गर्दी असते.

२. मामलेदार मिसळ, ठाणे-  

ठाणे आणि मामलेदार मिसळ हे मिसळप्रेमींच्या आवडीचं समीकरण. मामलेदारची खासियत म्हणजे इथली सुपरतेज मिसळ.फक्त २० रुपयांत तुम्हांला ही मिसळ चाखता येईल. 

३. फडतरे मिसळ केंद्र, कोल्हापूर-

फडतरे मिसळ म्हणजे मिसळप्रेमींच्या तीर्थक्षेत्रापैकी एक. मुंबई आणि ठाण्याच्या मिसळीनंतर तिसऱ्या क्रमांकावर येते ती कोल्हापूरची फडतरे मिसळ! चमचमीत आणि तिखट अशी या मिसळीची ख्याती आहे. सकाळपासूनच इथे स्थानिक तसेच पर्यटकांची रांग लागलेली असते.

४. बेडेकर मिसळ पाव, पुणे-

बेडेकरांची मिसळ म्हणजे पुणेकरांची शान आणि जान दोन्ही आहे. कमी तिखट पण तरी चवीला उत्तम अशी मिसळ आहे. पुणेकर हे मुळातच खवय्ये असतात. त्यामुळे बेडेकरांची मिसळ खाण्यासाठी मंगळवार ते रविवार पुणेकरांची गर्दी असते.

५. श्री अंबिका मिसळ ,नाशिक-

मिसळ म्हणजे लाल आणि चटकदार. पण नाशिकच्या मिसळीचे वेगळेपण म्हणजे येथे काळ्या मसाल्याची मिसळ मिळते. आणि त्याची अफलातून चव तुमच्या जीभेवर रेंगाळत राहते.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.