Now Reading:
देशाची मान उंचावणारे मराठी मातीने दिलेले ६ दिग्गज उद्योगपती
देशाची मान उंचावणारे मराठी मातीने दिलेले ६ दिग्गज उद्योगपती

उद्योग करणे हे मराठी माणसाच्या रक्तात नाही किंवा व्यवसाय करणे हे मराठी माणसाला जमत नाही असं आपण नेहमीच ऐकत असतो. पण अशी काही मराठी माणसे आहेत ज्यांनी ही गोष्ट खोटी ठरवली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत अशा यशस्वी मराठी उद्योजकांची माहिती ज्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची गोष्ट ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

बाबासाहेब निळकंठ कल्याणी

‘भारत फोर्ज’चे सर्वेसवा बाबासाहेब कल्याणी यांनी एका कंपनीमध्ये शॉप फ्लोरवर्कर म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर बिर्ला कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन ते आपल्या वडिलांच्या फॅक्टरीमध्ये रुजू झाले. पण आपला व्यवसाय वाढवा आणि त्यात केमिकल व रसायने याऐवजी अजून इतर उत्पादन तयार व्हावीत यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. ‘भारत फोर्ज’ ही भारतीय उद्योगविश्वातील नावाजलेली कंपनी आहे.

डॉ. विठ्ठल कामत

‘जगभरात कोणताही व्यवसाय करा पण खोट्या जाहिराती करून नव्हे’ या तत्वावर डॉ. विठ्ठल कामत यांनी मोठ्या जिद्दीने हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांनी रात्रदिवस मेहनत करून त्यांच्या हॉटेलच्या शाखा जगभर काढल्या आहेत. ते एक यशस्वी उद्योजक असून जागतिक दर्जाचे पर्यावरणवादी आहेत. त्यांचे ऑर्किड हॉटेल हे जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलांमध्ये गणले जाते.

वीणा पाटील

टूरची महाराणी असे पर्यटन विश्वात त्यांना संबोधले जाते. केसरी ते वीणा वर्ल्डचा त्यांचा प्रवास खडतर होता. वीणा पाटील यांच्यामुळे मराठी स्त्री एक यशस्वी उद्योजिका होऊ शकते हे सिद्ध झाले.

जयकुमार खंडेराव पाठारे

कपडा व्यवसायातील एक नामवंत नाव म्हणजे ‘व्ही. आय. पी.’ वार्षिक २०० कोटींचं उत्पन्न असलेल्या या ब्रॅण्डचे मालक जयकुमार खंडेराव पाठारे हे मुळचे कोल्हापूरचे. एकेकाळी वीजेच्या कामांची कंत्राटे घेणारे जयकुमारजी आज १०,००० कारागिरांना रोजगार पुरवत देशभरात एक घरगुती नाव होऊन बसलेत. त्यांच्या क्षेत्रातील लोक आपुलकीने त्यांना ‘VIP’ म्हणतात.

शंतनूराव लक्ष्मणराव किर्लोस्कर

जगप्रसिद्ध किर्लोस्कर समुहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे पुत्र म्हणजे शंतनुराव. त्यांचा द्रष्टेपणा आणि विस्तृत-वैश्विक विचार किर्लोस्कर समुहाच्या विकासामध्ये दिसून येतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही त्यांचा आपल्या कंपनीवरचा विश्वास दांडगा होता. १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिझेल इंजिनच्या स्वदेशी बनावटीचे श्रेयसुद्धा त्यांनाच दिले जाते.

विवेक रणदिवे

एक कुशल उद्योजक, लेखक, वक्ते आणि सामाजिक विकासास हातभार लावण्यास सदैव तत्पर असं व्यक्तिमत्व. विवेक रणदिवे हे ‘टिबको’ TIBCO या कंपनीचे सीईओ आहेत. १९८० च्या दशकात टेक्नीक्रॉन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत असताना वॉल स्ट्रीटच्या डिजिटायझेशनचं सगळं श्रेय त्यांनाच जातं. ‘दि पावर ऑफ प्रीडिक्ट’, ‘दि टू सेकंड अॅव्हरेज’ या त्यांनी लिहलेल्या पुस्तकांना जगभरातून प्रशंसा मिळालीय.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.