Now Reading:
आयफोनच्या किंमतीमध्ये येतील या वस्तू
आयफोनच्या किंमतीमध्ये येतील या वस्तू

महागडे फोन कोणाला वापरायला आवडत नाही. जितके जास्त फिचर्स तितकी मोबाइलची किंमत जास्त. अहो, पण त्याला मर्यादाही असायला हवी. आता आयफोनचेच मोबाइल घ्या ना. त्यांच्या किंमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. सध्या एक लाखापेक्षाही अधिक किंमत असलेल्या आयफोन x ची सगळीकडे चर्चा आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी लोक कोणकोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. कुणी किडनी विकेल, घर विकेल किंवा स्वतःलाही विकेल असे जोक्स आजकाल सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. असाच एक ठाण्याच्या नौपाडा भागातील आयफोनवीर नवा आयफोन X विकत घेण्यासाठी चक्क घोड्यावर बसून वाजत गाजत स्टोअरपर्यंत गेला होता. या आयफोनची किंमत भारतात ८९,००० रुपयांपासून १,०२,००० पर्यंत आहे. हा फोन घेण्यापेक्षा त्याचा तुम्ही इतर उपयोगी गोष्टींसाठी चांगला उपयोग करू शकता. चला तर पाहू एक लाख रुपये फक्त एका फोनवर खर्च करण्यापेक्षा याच रकमेत मराठी माणूस काय काय करू शकतो ते.

१. महाराष्ट्र दर्शन – 

एवढ्या मोठ्या रकमेत एखाद्याला पूर्ण महाराष्ट्र फिरून यायला नक्कीच आवडेल.

२. वडापाव-

वडापाव म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचा जीव की प्राण. यात अंदाजे ६,६०० वडापावची मेजवानी होऊ शकते.

३. Android मोबाइल –

जवळपास ७ हजार किंमतीचे चांगले १४-१५ android मोबाइल खरेदी करता येतील.

४. पैठणी –

एक लाखात प्रसिद्ध तथास्तुच्या बारा हजाराच्या ७-८ सुंदर पैठण्या विकत घेता येतील.

५. सिनेमा-

एक लाखात पॉश मल्टीप्लेक्सची अंदाजे ३३३ तिकिटे येतात. आयुष्यभरात आपण इतक्यावेळा सिनेमे बघायला जात नाही.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.