Now Reading:
प्रसूतीदरम्यान फायदेशीर ठरतील अशा गर्भधारणेवेळी पाळायच्या काही गोष्टी
प्रसूतीदरम्यान फायदेशीर ठरतील अशा गर्भधारणेवेळी पाळायच्या काही गोष्टी

बरेच वेळा गर्भवती स्त्रियांच्या मनात अनेक शंका असतात. आज तुमच्या ह्या सर्व शंका दूर होणार आहेत. जर गर्भवती होण्याची ही तुमची पहिलीच वेळ असेल तर घाबरू नका, तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन आजच्या या लेखातून होणार आहे.

गर्भधारणेच्या पहिल्या काही दिवसांत तुम्हाला थकवा जाणवू लागेल. तुमचे लघवीचे प्रमाण वाढल्याचेही तुम्हाला जाणवेल. पुढील २ ते ४ महिन्यात तुम्हाला होणारा त्रास आणि दुखणे वाढू शकते आणि हा त्रास तुम्हाला २ ते ४८ तास राहू शकतो. बाळाच्या वाढीकरीता हे होणं गरजेचं आहे. तुमच्या बाळाची वाढ निरखून पाहायची असेल तर तुम्ही “अल्ट्रासाऊंड” करून पाहू शकता.

पोटुशी असताना तुमचे आरोग्य जपले पाहिजे हे काही नवीन नाही. पण या वेळेस नक्की तुमच्या शरीराला काय काय आणि किती गरजेचे आहे हे जाणून घ्या.

१. धान्य खाल्याने तुमच्या शरीराला शक्ती मिळेल.

२. हिरव्या भाज्या आणि फळं तुमच्या शरीराला सुदृढ ठेवतील.

३. दूध प्यायल्याने तुम्हाला कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी मिळत राहील. 

९ महिन्यांनी प्रसव वेदांनांना सामोरे जाणे साजेसे असते. जेव्हा तुम्हाला कमी वेळात अधिक आकुंचनाच्या वेदना जाणवू लागतील तेव्हा तुमच्या बाळाची जन्मवेळ जवळ येत आहे हे समजून जा. डॉक्टरांचे असं म्हणणं आहे की ज्या महिला बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेला घाबरतात त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे या महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या बाळाच्या विचाराने न घाबरता या प्रक्रियेस सामोरे जा.

Input your search keywords and press Enter.