Now Reading:
नोकरदार महिलांसाठी इन्कम टॅक्समध्ये बचत करण्याकरिता काही किफायतशीर स्कीम्स
नोकरदार महिलांसाठी इन्कम टॅक्समध्ये बचत करण्याकरिता काही किफायतशीर स्कीम्स

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मिळकत कर (income tax) हा पुरुषांइतकाच आहे. काही वर्षांपूर्वी महिलांना ५००० ची सवलत मिळायची. पण त्यांना टॅक्समध्ये बचत जरी नसली तरी इतर पर्याय आहेत ज्यातून त्या कर वाचवू शकतात.

 

१. आरोग्य विमा-

आयकर कायदा ‘८० डी’ नुसार २५००० पर्यंत आरोग्य विम्याकरिता सवलत मिळू शकते.तसेच तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही पॉलिसी घेतली तर आणखी ५००० ची सवलत मिळू शकते.

 

२. टॅक्स वाचवण्याचे पर्याय-

आयकर अधिनियम ८० सी नुसार पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), एम्प्लॉयी प्रोविडेंट फंड (EPF) आदी मध्ये गुंतवणूक करून १,५०,००० पर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला दहा वर्षाहून लहान मुलगी असल्यास तिच्या नावे ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ वर्षाला १,५०,००० गुंतवणूक करू शकता ज्यावर ९.२ टक्के दराने व्याज मिळू शकतं. या दोहोंवर कर लागत नाही. आणि याचा कालखंड मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत असतो.

 

३. गृह कर्ज-

गृह कर्ज घेतल्याने कायदा ८० सी अन्वये १,५०,००० पर्यंत वार्षिक बचत करता येते. तसेच सेक्शन २४ गृह कर्जावरील व्याजावर २ लाखापर्यंत सवलत देते. जर हे तुमचे पहिले घर असेल तर २०१६ च्या बजेट अनुसार तुम्हाला आणखी ५०,००० ची सवलत मिळू शकते. पण ही सवलत ३५ लाख पर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावरच आहे. तसेच, तुमच्या घराची किंमत ५० लाखांहून कमी असणे गरजेचे आहे.

 

४. शैक्षणिक कर्ज-

कायदा ८० इ अन्वये, तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर वार्षिक १,५०,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. हे कर्ज स्वतःसाठी, मुलासाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठीही घेतले जाऊ शकते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.