Now Reading:
उन्हाळ्यात करता येतील असे १० उत्तम व्यवसाय
उन्हाळ्यात करता येतील असे १० उत्तम व्यवसाय

भारतातील उन्हाळा अत्यंत उष्ण असतो. अनेक भागांमध्ये तर आधीच दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात तर आणखीनच हाल होतात. शेती हा देशाचा मुख्य व्यवसाय आहे. देशाची अर्थव्यवस्थाही प्रचंड प्रमाणात पावसाळ्यावर अवलंबून आहे. पण, त्यावतिरीक्त उन्हाळ्यातही काही उत्पन्नाची साधने आहेत. या मोसमात करता येतील असे छोटे मोठे उद्योग पण खूप आहेत. अशाच १० छोट्या उद्योगांची माहिती आज घेऊया:

१. नारळ पाणी आणि पदार्थ

भारताच्या अर्थव्यवस्थेत नारळ उत्पादनाचं स्थान महत्त्वाचं आहे. जगात सगळ्यात जास्त नारळाचे उत्पादन आपला देश करतो. नारळ पाणी किंवा नारळापासून बनलेल्या पदार्थांची विक्री असे व्यवसाय तुम्ही करू शकतात.

२. फळांचा ज्यूस (रस)

उन्हाळ्यात फळाचा रस शरीराला ताजेपणा देतो. एखादे ज्यूस सेंटर सुरु करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ आहे.

३. आइस्क्रीम

आइस्क्रीम आवडत नाही असा व्यक्ती शोधणं कठीण आहे. विविध प्रकारचे आणि चवींचे आइस्क्रीम बनवून तुम्ही त्याची विक्री करू शकता. अनेक प्रकारच्या चवींसोबत प्रयोग करा.

४. आइस्क्रीमचे दुकान

जर तुम्हाला आइस्क्रीम बनवून विकण्यात रस नसेल तर इतर कंपनीचे आइस्क्रीम तुम्ही विकू शकता. कॉर्नेटो, अमूल, हॅवमोर सारख्या ब्रँडचे आइस्क्रीम तुम्ही विकू शकता.

५. लिंबू पाणी

गरम झालं की लिंबू पाणी पिण्याची सवय अनेक लोकांना असते. आणि हे बनवणं देखील सोपं आहे. हा उद्योग सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त पाणी, लिंबू, साखर आणि मिठ या गोष्टींची गरज लागेल.

६. पिण्याचे पाणी

पाण्याची तहान पाणीच भागवू शकतं. आज काल लोक सहलीवर असले की, पॅकेज केलेलं पाणी पिणंच पसंत करतात. कारण ते स्वछ आणि सुरक्षित असतं. त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या विक्रीचा पर्यायही उत्तम आहे.

७. रेनकोट बनवणे

रेनकोन बनवणं काही कठीण काम नाही. यात तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे रेनकोटची डिझाइन बनवणं, त्याला आकार देणं आणि शेवटी त्याला रेनकोटच्या आकारात शिवण.

८. वाळू व्यवसाय

बांधकाम उद्योगात वाळूचा उपयोग होतो. वाळू व रेतीचा पुरवठा करणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

९. टोमॅटो

टोमॅटोच्या उत्पन्नाचा फायदा खूप आहे. टोमॅटोपासून सॉस, प्युरी, केचप आणि पल्प बनतो. याची निर्मिती करण्यासाठी तुम्ही लहान प्रमाणात उद्योग चालू करू शकता.

१०. छत्री

उन्हाळ्यानंतर लगेचच पावसाळ्याचे दिवस येतात. छत्री विक्रीचा उद्योग करणं एक चांगली कल्पना होऊ शकते कारण उन्हापासून बचावासाठी पण लोक छत्रीचा वापर करतात.

 Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.