Now Reading:
जगप्रसिद्ध यशस्वी व्यक्तींच्या झोपण्यापूर्वीच्या ५ अजब सवयी
जगप्रसिद्ध यशस्वी व्यक्तींच्या झोपण्यापूर्वीच्या ५ अजब सवयी

तुम्ही दिवसअखेर काय करता हे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर परिणामकारक करतं. तुम्ही दिवसातील ५ मिनिटे देऊन आपल्या रात्रीच्या कामांचा क्रम आखू शकता. यामध्ये किमान एक अशी गोष्ट असावी जेणेकरून तुम्हाला मानसिक संतुलन नियंत्रणात ठेवता येईल. तुम्हाला पटत नाही तर वाचा या जगप्रसिद्ध व्यक्तींचे काय मत आहे ते-

स्वतःची काळजी घेणे

जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका एरियाना हफिंग्टन २००७ मध्ये एकदा थकवा येऊन जागीच कोसळून पडल्या. आयुष्यात हा एवढा मोठा धडा मिळाल्यावर झोपेला सर्वात पहिलं प्राधान्य असायला हवं याची त्यांना जाणीव झाली.

आता त्या आपली दिवसभराची कामं आटपली की स्वतःसाठी काढलेल्या दोन तासाचा क्रम सुरु करतात. प्रथम त्या आपला फोन बंद करतात त्यासोबत इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना रुमबाहेर ठेवतात. त्यानंतर निवांत आंघोळ करतात. मग इतर कसलाही विचार न करता झोपी जातात.

घरची कामे

आपल्या सर्वांच्या देखत बिल गेट्स हे जगातील शेवटचा व्यक्ती असतील जे घरची लहानसहान कामे स्वतःच करतात. पण दिवसअखेर घरची कामे आटपून मगच झोपण्याची त्यांना सवय आहे. घरी आल्यावर जेवल्यानंतर ते घरातील भांडी घासतात, केर काढतात. जेणेकरून सकाळी उठल्यावर त्यांना त्याचं घर स्वच्छ दिसेल.

बऱ्याच अभ्यासिकांनुसार, साफसफाईमुळे मन प्रसन्न राहतं. एवढंच नाही तर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझो मनावरचा ताण कमी करण्यासाठी स्वतःची भांडी ते स्वतः घासतात. यामुळे त्यांना त्यांची एकाग्रता परत मिळवण्यास मदत होते.

वाचन

बिल गेट्स रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास वाचन करतात. त्यांना गरिबी, आरोग्य, हवामान यासारख्या विषयांबद्दल वाचायला जास्त आवडते. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा तसेच फॅशन डिझायनर वेरा वँग हे सुद्धा झोपण्यापूर्वी वाचनावर भर देतात.

व्यायाम

तसं पाहिलं तर सहसा कसरत सकाळची केली जाते. बफरचे सीईओ जोएल गॅस्कॉइन रात्री झोपण्यापूर्वी २० मिनिटं चालणे पसंत करतात. जेणेकरून त्यांना दिवसभरातील तणावातून स्वतःला परावृत्त करता येतं. प्रसिद्ध उद्योजिका व टिव्ही तारका ओप्रा विनफ्रे रोज झोपण्यापूर्वी चिंतन करते. चिंतन केल्याने तिला सर्व नकारात्मक विचारांना पुसण्यास मदत होते.

पुढील दिवसाची यादी

अमेरिकन एक्सप्रेसच्या सीईओ केनेथ शेनॉ यांना झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी करण्याच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवणे पसंत करतात. असे केल्याने त्यांना आजच्या दिवसावर पुर्णविराम द्यायला मदत होते व पुढच्या दिवसाच्या तयारीला लागता येते.

Input your search keywords and press Enter.