Now Reading:
इतरांशी स्वत:ची तुलना करु नका, कारण..
इतरांशी स्वत:ची तुलना करु नका, कारण..
stop comparing yourself to others

अनेकदा आपण नकळत इतरांशी स्वतःची तुलना करतो. पण यामुळे स्वतःच स्वतःला आपण कमी लेखतो हे तुम्हाला कळते का? बहुतांशी आपण एखादी व्यक्ती किती स्मार्ट आणि सुंदर दिसते या तिच्या बाह्य शारीरिक सौंदर्याकडे पाहतो आणि हेच तिचे व्यक्तिमत्व समजतो. हे चुकीचे आहे. लहानपणापासून आपण सतत स्वतःची तुलना कोणाशी तरी करततो, कधी भावंडे, मित्र- मौत्रिणी तर कधी प्रसिद्ध लोक. कधी कधी तर समोरची व्यक्ती किती सुंदर दिसते यामुळे स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही वास्तविकता आहे.

सामाजिक तुलना अतिशय लहान वयात सुरू होते. मुले फार लवकर समजून जातात की प्रत्येकजण एकसारखं जीवन जगत नाही. त्यांच्या काही मित्रांना अधिक चांगली खेळणी किंवा कपडे मिळतात हे पाहून त्यांच्या मनात तुलना करण्याची भावना निर्माण होते. पुढे जसे ते मोठे होतात तशी ही भावना अधिक दृढ होते. मी एक चांगला व्यक्ती नाही किंवा मी हे कधीच करू शकत नाही अशा अनेक गोष्टी मोठं झाल्यावर मनात येऊ लागतात. अशा प्रकारचे निराशाजनक विचार मुलांमध्ये चिंता आणि उदासिनता निर्माण करतात. याचा प्रभाव त्यांच्या प्रौढ जीवनात पडतो. पुढील पाच कारणे वाचल्यावर तुम्हालाही कळेल की तुलना करणे किती घातक आहे.

आनंद हिरावणे

इतरांशी स्वतःची तुलना केल्याने आपले जगणे केवळ अवघडच होत नाही तर आयुष्यातील सुखही आपण हिरावून बसतो आणि दुःखाच्या आहारी जातो. त्यापेक्षा लोकांकडून प्रेरणा घ्या.

प्रगती खुंटते

जर तुम्ही स्वतःपेक्षा इतर लोकांच्या यशाकडे लक्ष ठेऊन असाल, तर तुम्ही काहीचं साध्य करू शकणार नाही. तुमची स्वत:ची स्वप्ने आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ कामी लावला तर तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. इतरांवर आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये.

बाह्य रुप बदलणे अशक्य

तुमचे बाह्य रुप जसे आहे तसेच राहणार. स्वतःला स्वीकारायला शिका.असं समजून चाला की, तुमच्या सारखं अजून या जगात कोणी नाही. तुमच्यात असलेले कलागुण, संस्कार प्रत्येकाकडे असतीलच असे नाही.

कोणीही परिपूर्ण जीवन जगत नाही

समोरचा व्यक्ती किती आनंदी आहे आणि परिपूर्ण जीवन जगतोय असे आपल्याला वाटते. पण नेहमीच तसं असेल असे नाही. या जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात समस्या आणि आव्हानांना सामोरा जात असतो. यातून कोणाचीही सुटका नाही.

शेरास सव्वाशेर नेहमीच असतो

आयुष्यात जितक्या लवकर ही गोष्ट आपण स्वीकारु तेवढं बरं. प्रत्येकाच्या जीवनात अधिक चांगल किंवा सरस कोणीतरी नेहमीच असतं.

Input your search keywords and press Enter.