Now Reading:
८ पायऱ्यांत सुरु करा स्वतःचा छोटेखानी व्यवसाय
८ पायऱ्यांत सुरु करा स्वतःचा छोटेखानी व्यवसाय

प्रत्येकाचं स्वप्र असतं की आपल्या मालकीचा व्यवसाय असावा. आपल्यावर दुसऱ्या कोणाचंही नियंत्रण नसावं. आपले आपण बॉस! घरोघरी अशी स्वप्नं कुढत असतात. पण बऱ्याचदा ही स्वप्नं स्वप्नच बनून राहतात, ती प्रत्यक्षात कधीच उतरत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे की, ‘एकदा पाण्यात उडी मारली की, माणूस आपोआप पोहायला शिकतो.’ पण, खबरदार! व्यवसाय-धंद्याच्या समुद्रात उडी मारण्यापूर्वी एकदा ही पोस्ट वाचा आणि या क्रमाने आपला व्यवसाय सुरू करा जेणेकरून तुम्ही बुडणार नाही.

१. तुमचं व्यवसाय क्षेत्र निवडा

व्यवसाय क्षेत्र निवडताना आपली आवड, कौशल्य, व्यक्तिमत्व, आर्थिक कुवत तसेच बाजारातील उपलब्ध संधींचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

२. कामकाजाचा आराखडा

व्यवसाय क्षेत्र निवडल्यावर संपूर्ण कामकाजाचा एक विस्तृत आराखडा तयार करा. संशोधनात असं आढळून आलंय की, ज्यांची कामकाजाची योजना सुनिश्चीत असते ते इतरांपेक्षा जास्त नफा मिळवतात.

३. भांडवल उभे करा

व्यवसाय सुरु करताना किमान यंत्रसामग्री, भाडे खर्च, कामगारांचा किमान तीन महिन्यांचा पगार इतक्या रक्कमेची तरतूद करणे गरजेचे आहे. भांडवलाचे स्रोत शोधताना सखोल संशोधन करा.

४. उद्योगाचं स्वरुप

तुम्ही सुरु करत असलेला व्यवसाय खाजगी मालकीचा, भागिदारीमध्ये आहे की, मर्यादित दायित्वाची कंपनी आहे हे ठरवा.

५. परवाने व कागदपत्रे

व्यवसाय सुरु करताना नियम व कायद्यांची माहिती असणे, त्या निगडीत सर्व परवाने व कागदपत्रे तयार ठेवणे कधीही सोयीचे ठरते.

६. जागेची निश्चिती

व्यवसायासाठी मोक्याची जागा निवडा. जेणेकरुन माल वाहतूक आणि खरेदी-विक्रीसाठी अडचण येणार नाही.

७. विमा उतरवा

आपत्ती कधीही येऊ शकते. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या यंत्र सामग्रीचा आणि जागेचा विमा उतरवा.

८. अकाउंटिंग यंत्रणा

अकाउंटिंग यंत्रणा असणे व्यवसायाच्या वृद्धीसाठी अत्यावश्यक आहे. होणाऱ्या खर्चाचं विश्लेषण केल्यास वायफळ खर्च टाळता येतो. तसेच नुकसानही होत नाही.

Input your search keywords and press Enter.