Now Reading:
वयाच्या प्रत्येक टप्प्यात हृदयविकारावर प्रतिबंधात्मक उपाय
वयाच्या प्रत्येक टप्प्यात हृदयविकारावर प्रतिबंधात्मक उपाय

हृदयविकार काेणत्याही व्यक्तीस काेणत्याही वयात हाेऊ शकतात. आज चांगली हसत खेळत असलेली व्यक्ती कोणत्या क्षणी हृदयविकाराला बळी पडेल सांगत येत नाही. या आजाराच्या मुळाशी गेलं असता बहुतेक वेळेस आपला आहार, जीवनशैली कारणीभूत असल्याचे आढळते. यावर प्रतिबंध म्हणून काही मुलभूत सवयी अंगिकारणे तसेच शरिरात हाेणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. तर हा प्रतिबंध म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या-

वीस ते तीस वयाेगटातील व्यक्तींनी घ्यावयाची काळजी-

नियमितपणे सहामाही किंवा वार्षिक आराेग्याची तपासणी करा. 

शारीरिक हालचाली करा, सक्रिय राहा.

धुम्रपान करु नका.

तीशीतील प्रतिबंध- 

हृदयास अपायकारक आहार आणि जीवनशैली टाळा.

कुटुंबातील हृदयविकाराच्या रुग्णांचा इतिहास पडताळा.

शक्य तितके तणावात राहणे टाळा.

चाळीशीचा गट-

वजनाकडे लक्ष द्या. वाढतं वजन कमकुवत चयापचय संस्थेचं लक्षण असतं.

रक्तातील शर्करेचं प्रमाण नियमितपणे तपासा.

झाेपेतील घाेरणं हसण्यावर घेऊ नका, त्याची तपासणी करा.

पन्नाशीतील गट-

पाेषक आहार घ्या.

हृदयविकाराच्या लक्षणांबद्दल माहिती ठेवा.

डॉक्टरने आखलेल्या आहारावर कटाक्षाने अंमल करा.

साठी आेलांडल्यावर घ्यावयाची काळजी- 

वजनावर ताबा ठेवा.

संपूर्ण शरिराची तीन महिन्यांतून एकदा तपासणी करा.

सहज शक्य व्यायाम करा.

सर्वांनीच घ्यावयाची काळजी-

पाेषक आहार घेणे.

दरराेज किमान पाच मिनिटे धावणे.

Input your search keywords and press Enter.