Now Reading:
SC/ST महिला उद्योगपतींसाठी सरकारी योजना
SC/ST महिला उद्योगपतींसाठी सरकारी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी २०१६ मध्ये “द स्टॅन्ड अप इंडिया” योजना सुरु केली. ५ एप्रिल २०१६ मध्ये SC/ST च्या महिलांसाठी नवीन योजना सुरु झाली. या महिलांनादेखील स्वतःचा उद्योग सुरु करता यावा हा या योजनेचे मूळ हेतू आहे. या योजनेनुसार १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

 

सरकारला कळली महिलांची गरज-

सरकारच्या असं लक्षात आलं की ९० टक्के महिलांना स्वतःच्या बचतीमधून पैसे काढून उद्योगात गुंतवावे लागतात. त्यात ६८ टक्के महिलांना बँकेतून कर्ज घेणं पण कठीण होतं. त्या करता ही योजना अंमलात आणली.

योजनेने होईल प्रत्येकाला फायदा-

ही योजना फक्त त्याच उद्योगांना मदत नाही करत जे आधीच स्थापित आहेत तर नवीन उद्योग सुरु केलेल्यांनादेखील (स्टार्ट अप) मदत करते. पुढील वर्षात ही योजना अडीच लाख महिलांच्या कामी येणार आहे असे म्हटले जात आहे.

आंध्र प्रदेश राज्यात SC/ST महिला उद्योगपतींची वाढ दिसून अली आहे. येणाऱ्या काळात ही वाढ आणखी प्रमाणात प्रत्येक राज्यात दिसून येईल अशी इच्छा सरकारने व्यक्त केली आहे.

Input your search keywords and press Enter.