Now Reading:
सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या टॉप ९ शॉर्टकट्सचा अर्थ
सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या टॉप ९ शॉर्टकट्सचा अर्थ

मानवजातीला संकेतचिन्हांचा शोध लागला तेव्हापासून संदेशवहन सुरू आहे. त्यानंतर भाषेला निरनिराळी वळणे मिळत गेली. २१व्या शतकाच्या सुरुवातीस एसएमएस आणि एमएसएन काळात एक नवीन प्रकार सुरू झाला ‘शॉर्टकटचा’. ‘Are’ चा झाला ‘r’, ‘you’ चा झाला ‘u’, या स्वरुपात टायपिंगला एक नवा पैलू मिळाला. लोक अधिकाधिक शॉर्टकट वापरू लागले. त्यानंतर त्यांना आणखी संक्षिप्त करण्यात आलं. तीन-चार शब्दांच्या संक्षिप्त रुपात लिहण्याची पद्धत सुरू झाली. पण काहीवेळेस या शॉर्टकटचा लॉंग कट होऊन असा काही गोंधळ उडतो की विचारू नका. यापुढे तुमचा असा हशा होऊ नये म्हणून घेऊन आलोय ही निवडक शॉर्टकट्सची यादी-

AMA ( एएमए) –

हे कोणत्याही हॉस्पिटलच नाव नाहीये हा. तर या शब्दाचा अर्थ ‘Ask Me Anything’ असा होतो म्हणजे ‘मला काहीही विचारा’. यापुढे तुम्हाला असा टेक्स्ट आला तर घाबरुन जाऊ नका.

HBD –

आता आपल्याला हा शॉर्टफॉर्म परिचयाचा असेल. प्रत्येक वाढदिवसाला असे महाव्यस्त महाभाग असतात जे त्यांच्या आयुष्यातील अतिमहत्त्वाचे ५ सेकंद वाचवून HBD असं लिहून शुभेच्छा देतात. याचं विस्तारीत रुप म्हणजे ‘Happy birthday’

OOTD –

हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळा इन्सटाग्रामवर पाहायला मिळतो. याचा अर्थ Outfit of the day असा होतो म्हणजेच आजच्या दिवसाचा पोशाख.

DM-

आता प्रथमदर्शनी असं वाटेल की, हे कोणत्या तरी मॅनेजर किंवा डायरेक्टरच्या पोस्टचं संक्षिप्त रुप आहे. पण, मुळात या DM चं विस्तारीत रुप आहे ‘Direct Message’. जर तुम्हाला कोणी सांगितलं की ‘DM कर’. याचा अर्थ होतो की मॅसेज कर.

TBT-

गुरुवार आला की साईबाबाची गाणी घराघरातून ऐकू यायची. तशीच आजच्या काळाचं गुरुवारचं व्रत म्हणजे ‘TBT’. TBT चे विस्तारीत रुप आहे ‘Throwback Thursday’. याचा वापर भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी केला जातो. गुरुवारी एखादा जुना फोटो पोस्ट करता येतो व त्याच्या कॅप्शनमध्ये TBT लिहावे.

TBH-

पॅथोलॉजी लॅबमधील रक्ताच्या रिपोर्टमध्ये दिसणाऱ्या RBC, WBC सारख्या संज्ञांप्रमाणे दिसणारा हा शब्द. याचा त्याशी दूरदूरवर संबंध नाही. TBH चं विस्तारीत रुप आहे ‘To Be Honest’. याचा वापर एखादं प्रामाणिक मत मांडताना केला जातो.

IMO-

IMO म्हणजे ‘In my opinion’. आपलं मत मांडताना हा शॉर्टकट वापरला जातो. IMO चा मराठी अर्थ होतो ‘माझ्या मते’

TL; DR-

इंटरनेटवर लांबच लांब उतारे कमेंटमध्ये मांडणाऱ्यांची कमी नसते. अशावेळी वाचायचा कंटाळा आल्यावर या शॉर्टकटचा वापर करा. ‘TL: DR’ म्हणजे ‘Too Long; Didn’t Read’ अर्थात ‘तुम्ही टाकलेली पोस्ट खूपच लांबलचक आहे म्हणून नाही वाचली’.

AFAIK ( एएफएआयके )-

हे वाचल्यावर असे वाटते एखाद्या आजाराचे किंवा कंपनीचे नाव आहे. पण, हा शब्द म्हणजे ‘As far as I know’ म्हणजे ‘जितकं मला ठाऊक आहे’.

Cover Image Source: Twitter

Input your search keywords and press Enter.