Now Reading:
७ फायदेशीर जोडधंदे ज्यातून कमी भांडवलात तुम्ही करू शकाल जास्त कमाई
७ फायदेशीर जोडधंदे ज्यातून कमी भांडवलात तुम्ही करू शकाल जास्त कमाई

आठ तासाच्या पगारी नोकरीवर आजकाल कोणाचंच भागत नाही. प्रत्येकाला बिझनेस करायचाय. पण अडचण असते भांडवलाची! म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय हे काही जोडधंदे जे तुम्ही अगदी कमी भांडवलात सुरु करू शकता!

१. ऑनलाइन टि-शर्ट स्टोर (E- Marketing)-

ई-मार्केटींगच्या युगात ऑनलाइन टि-शर्ट स्टोर हा एक चांगला जोडधंदा होऊ शकतो. यात गुंतवणूक सुद्धा जास्त नाहीये.

२. ATM साठी जागा-

डिमॉनेटायझेशनच्या काळात जाणवलेल्या ATM च्या कमतरतेनंतर देशभरात जागोजागी ATM उभे केले जात आहेत. अशा वेळी बँकांना ATM साठी जागा भाड्याने देण्याचा व्यवसाय हा एक मस्त पर्याय आहे.

३. सौरऊर्जा प्रकल्प-

सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी बऱ्याच योजना सुरु केल्यात. त्या योजनांचा लाभ घेऊन तुमच्या जागेवर किमान १ मेगावॅटचा प्लान्ट उभा करून पैसे कमवू शकता.

४. फ्लेक्स प्रिंटिंग-

बॅनरबाजी महाराष्ट्राला नवी नाही. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत बॅनर लागतात. यासाठी भाड्याच्या जागेत एक कॉम्प्यूटर (computer) व एक प्रिंटिंग मशीन (printing machine) एवढ्यावर तुम्ही फ्लेक्स प्रिंटिंग सुरु करू शकता.

५. नट बोल्ट (Nut Bolt)-

मशीन इंडस्ट्रीला मरण नाही. मशीन आली की नट बोल्ट्स आले. तंत्रक्षेत्रात शिरकाव करणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुरुवात ठरू शकते.

६. बेकरी (Bakery)-

बेकरीच्या व्यवसायाला सध्या फारच सुगीचे दिवस आलेत. केक (cake), पेस्ट्री (pastry), कुकीज (cookies), मफिन्स (muffins) हे पदार्थ तुम्ही घर बसल्याही करू शकता.

 

७. पेपर बॅग (Paper Bag)-

पॅकेजिंग इंडस्ट्री एव्हरग्रीन क्षेत्र आहे. पेपर बॅग बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व जागा भाड्याने घेऊन तुम्ही किमान गुंतवणुकीत हा व्यवसाय करू शकता.

Input your search keywords and press Enter.