Now Reading:
झोपण्याच्या या पद्धतींनी कमर, पाठ दुखी, तणावाला करा रामराम!
झोपण्याच्या या पद्धतींनी कमर, पाठ दुखी, तणावाला करा रामराम!

प्रत्येक व्यक्तीला निरोगी स्वास्थ्यासाठी किमान ७-९ तास झोपेची गरज असते. अन्न, पाणी यांच्या इतकेच झोपेचेही महत्त्व आहे. आवश्यकते एवढी झोप न मिळाल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. संशोधनानुसार, प्रत्येक मनुष्य त्याच्या आयुष्यातील २५ वर्षे झोपण्यात घालवतो.

झोप पूर्ण न झाल्यास ब्लड प्रेशर, डोके दुखी, मायग्रेन, सायनस, ताण- तणावा सारखे त्रास होऊ शकतात.  पण, तुम्ही किती वेळ झोपता यासोबतच तुम्ही कश्याप्रकारे झोपता हेसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. झोपण्याच्या पद्धतीचा आरोग्यावर बराच परिणाम होतो. त्यामुळे आजारांना पळवण्यासाठी झोपेच्या काही पद्धती जाणून घेऊयात.

१. छातीत दुखणं

अपचनामुळे छातीत दुखण्याची शक्यता असते. हा त्रास थांबवण्यासाठी डाव्या कुशीवर, शरीर ताठ ठेऊन झोपा.

२. मानेचा त्रास

पेन फिजिशन्सच्या मते, मानेच्या त्रासा पासून मुक्ती मिळवण्यासाठी डोक्याखाली एकत उशी घेऊन झोपा. किंवा, तुम्ही टॉवेल रोल करून सुद्धा माने खाली ठेऊ शकता, याने मानेला आराम मिळेल.

३. पाठ दुखी

जर तुम्हाला पाठ दुखीचा त्रास असेल तर, पाठीवर झोपणं उपायोगाचं ठरू शकतं. याच बरोबर, तुमच्या पायाखाली एक उशी आणि पाठीच्या वक्र भागाखाली टॉवेल रोल करून ठेवल्याने पाठ दुखीपासून आराम मिळेल.

४. खांदे दुखी

खांदे दुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ज्या बाजूला त्रास होतोय त्याच्या दुसऱ्या बाजूच्या कुशीवर झोपा. याच सोबत दोन्ही पाय जवळ हाताखाली एक उशी ठेवा याने तुम्हाला थोडा आराम मिळेल.

५. डोके दुखी

सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास सरळ ताठ झोपा. यावेळी डोक्याच्या बाजूने उश्या लावा. जेणेकरून तुमची मान झोपेत सरळ राहिल.

६. अपचनाचा त्रास

पचन क्रिया व्यवस्तिथ चालण्या करिता तुम्हाला डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत गरजेचं आहे. मनुष्यच्या शरीरात पोट आणि स्वादुपिंड डाव्या बाजूला स्तिथ आहे, म्हणून गुरुत्वाकार्षना मुले पचन क्रिया वाढते.

७. सायन्स इन्फेकशन

जर तुम्हाला सायन्सचा त्रास असेल तर तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे की तुमच्या झोपण्याच्या स्तिथीने सायन्स इन्फेकशनवर परिणाम होऊ शकतो. झोपताना तुमचं डोकं बाकी शरीरापेक्षा वर राहिलं पाहिजे.

८. मासिक पाळीने होणारा त्रास

मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला गुढग्याखाली उशी ठेऊन झोपल्याने आराम मिळेल.

९. उच्च रक्तदाब

झोपण्याच्या पोसिशनने रक्तदाबावर परिणाम होतो, म्हणूनचं तुम्हाला पोटाच्या बळावर झोपणं गरजेचं आहे.

 

Input your search keywords and press Enter.