Now Reading:
घरगुती पद्धतीने कायम राखा त्वचेतील ओलावा; मात करा उन्हाळ्यातील उष्णतेवर
घरगुती पद्धतीने कायम राखा त्वचेतील ओलावा; मात करा उन्हाळ्यातील उष्णतेवर

हिवाळा गेला तसा आता उन्हाळा आला. ४ महिने कोरड्या त्वचेवर मात करून झाली नि आता गरमी आली. चहुकडे रखरखतं ऊन, त्यासोबत वाढलेली उष्णता, घामाच्या धारा यातून शरीराची पार लाहीलाही होते. म्हणूनच घेऊन आलोय त्वचेची काळजी घेण्याचे घरगुती उपाय.

काकडीचा फेस पॅक

त्वचा थंड ठेवण्यासाठी काकडी कामी येते. तुमच्या त्वचेवर जर उष्णतेचा चटकन परिणाम होत असेल तर तुम्ही नक्कीच काकडीच्या फेस पॅकचा उपोयग करणे गरजेचे आहे. फ्रिजमधील थंड काकडी मिक्सरला लावून त्याचा रस काढा. रस गाळून तो कापसाच्या सहाय्याने चेहऱ्याला लावा. चेहरा धुण्याआधी फेसपॅक सुकू द्या. यामुळे त्वचेवरील छिद्रे भरून निघतील आणि त्वचेतील आर्द्रता कायम राखण्यास मदत होईल.

ग्रीन टी

ग्रीन टी उन्हाळ्यात त्वचेवर होणाऱ्या परिणामांशी लढण्यास मदत करते. २ बॅग ग्रीन टी १ पेला पाण्यात उकळा. त्यानंतर हे मिश्रण थंड करत ठेवा व त्यात ५ थेंब ‘टी ट्री ऑइल’ टाका. हे मिश्रण पुन्हा फ्रिजमध्ये थंड करत ठेवा. बाहेरुन आल्यावर हे चेहऱ्यावर स्प्रे करा. ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आराम देतात. तसेच ट्री ऑइलमधील अँटी बॅक्टेरियल सत्व पुरळ येण्यापासून रोखतात.

त्वचेचा ओलावा

उष्णतेशी लढताना त्वचेतील ओलावा कायम राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मॉइस्चराइजरचा वापर करावा. याने त्वचेला खाजही सुटणार नाही व त्वचेचं तेजही कायम राहील.

बर्फाने मसाज

यूव्ही किरणांमुळे त्वचेची दुरावस्था होते व त्वचा लालसर होते. म्हणूनच बहुतेक सौंदर्य चिकित्सक सल्ला देतात की, बाहेरुन आल्यावर चेहऱ्यावर बर्फ लावून मसाज करावा. असे केल्याने चेहऱ्याची जळजळ तर थांबतेच पण सोबतच रक्तप्रवाहसुद्धा सुधारतो.

सनस्क्रीन वापरणे

उन्हात भटकल्याने तशीही त्वचा भाजली जाणारच आहे. त्यापेक्षा आधीच सनस्क्रीन वापरली तर त्वचेवर उष्णतेच्या दुष्परिणामांचे प्रमाण कमी होते. कारण सनस्क्रीन यूव्ही किरणांशी लढा देऊन त्वचेची काळजी घेण्यास मदत करते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.