Now Reading:
हिवाळ्यात त्वचेचा तजेला राखण्यासाठी हे साधे नियम पाळा
हिवाळ्यात त्वचेचा तजेला राखण्यासाठी हे साधे नियम पाळा

हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरडी त्वचा पांढरी पडू शकते. पण या काही टिप्स वापरून तुम्ही तुमची त्वचा सुंदर व तजेलदार ठेऊ शकता. 

१. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्यात वेगळाच आनंद असतो. पण तुमचा चेहरा व हात धुताना कोमट पाण्याचा वापर करा, याने तुमची त्वचा कोमल राहिल. 

२. आंघोळी नंतर तुमची त्वचा लगेच कोरडी पडू शकते त्यामुळे लगेच क्रीम लावून त्वचेचा ओलावा कायम ठेवा. उदा. मॉइस्चुराइझर

३. तुम्ही जे मोइस्चुराइजर वापरता ते बघून निवडा. तुमच्या त्वचेला साजेसं असेच मोइस्चुराइजर निवडा.  

४. कुठे बाहेर जायचं झालं तर तोंडावर स्कार्फ बांधून बाहेर पडा ज्याने धूळ मातीमुळे तुमची त्वचा कोरडी नाही पडणार.

५. हिवाळ्यात तहान लागण्याची शक्यता कमी असते पण आपल्या शरीराला पाण्याचीही तेवढीच गरज असते जेवढी उन्हाळ्यात असते. त्यामुळे दिवसभरात सतत पाणी पीत राहणे गरजेचे आहे.

६. कलिंगड, सफरचंद, केळ, मध, बदाम खाल्याने तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत राहील आणि त्वचा टवटवीत राहील.

 

 

Input your search keywords and press Enter.