Now Reading:
धुलिवंदनाला त्वचेची काळजी कशी घ्याल?
धुलिवंदनाला त्वचेची काळजी कशी घ्याल?

येत्या शुक्रवारी देशभरात रंगपंचमी-धुळवड मोठ्या उत्साहात साजरी होईल. या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. पण रंगात न्हाऊन निघण्यासाठी अनेकदा रासायनिक रंग वापरले जातात. त्याने त्वचेला नुकसान पोहोचण्याची भीती असते.

रासायनिक रंग त्वचेला चिकटून बसतात.

या रंगात शिसे, पारा, अॅल्युमिनियम, क्रोमियम असे विषारी पदार्थ असतात. असे घातक पदार्थ वापरलेले रंग साध्या साबणने निघत नाहीत. मग अनेक जण रॉकेल किंवा पेट्रोल त्वचेला लावून रासायनिक रंग धुण्याचा प्रयत्न करतात. परिमाणी, यामुळे त्वचेला अधिक नुकसान पोहोचते. पण घाबरू नका, तुमच्या रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी, रंगपंचमी खेळताना त्वचेची कशी काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही येथे देत आहोत-झणझणीत… लज्जतदार मिसळ म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण! तशी मसालेदार तररी आणि चमचमीत मिसळ महाराष्ट्रात सर्वत्र मिळते. पण आज आपण पाहू महाराष्ट्रातील ५ अशी भन्नाट मिसळ केंद्र जिथे लज्जतदार मिसळ मिळते-

पूर्ण शरीर झाकलं जाईल याची काळजी घ्यापूर्ण हाताचे शर्ट किंवा टी-

शर्ट घाला आणि महिलांनी पूर्ण लेगिन्स घाला. जेणेकरून तुमच्या शरीराच्या नाजूक त्वचेवर त्याचा परिणाम होणार नाही.

तेल लावा

धुळवड खेळायला जाण्यापूर्वी केसांना आणि हाता-पायांना भरपूर बदामाचे तेल किंवा अन्य कोणतंही तेल लावा. यामुळे रंगांमध्ये असणा-या हानिकारक रसायनांपासून तेल तुमच्या त्वचेचा बचाव करेल. इतकेच नव्हे तर नंतर तुमच्या अंगांवरचा रंग काढण्यासाठीही यामुळे मदत होईल.

भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्यायलाने तुमच्या शरीरात पाण्याचा अंश असेल. त्यामुळे कोणत्याही केमिकल्सचा शरीरावर परिणाम होणार नाही.

सनस्क्रीन

सनस्क्रीन लावल्याशिवाय घरातून अजिबात बाहेर पडू नका. सूर्य आणि हानिकारक रंगांपासून सनस्क्रीन तुमच्या त्वचेचा बचाव करेल. बाहेर जाण्याच्या २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा.

शरीरावरचा रंग कसा काढाल?

चेह-यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. रंग काढताना डोळे आणि ओठ बंद ठेवावेत.

या सर्व गोष्टी तुम्हाला उपयोग पडतीलच. पण उपचारांपेक्षा सावधनता बाळगलेली केव्हाही चांगलीच. त्यामुळे हानिकारक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि धुळवडीचा आनंद लुटा.

Input your search keywords and press Enter.