Now Reading:
EMI वर स्मार्टफोन घ्यावा का?
EMI वर स्मार्टफोन घ्यावा का?

हल्लीचा जमाना स्मार्टफोनचा जमाना म्हणून ओळखले जाते. सध्याच्या काळात तर बरेचजण स्मार्टफोनची खरेदी ऑनलाइनच करतात. अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स स्मार्टफोनची विक्री करतात. पण चांगल्या दर्जाच्या स्मार्टफोनच्या किमतीही आता गगनाला भिडल्या आहेत. म्हणूनच ग्राहकांच्या सोयीनुसार सुलभ हफ्त्यांनीही स्मार्टफोनची खरेदी करता येते. हफ्ते भरुन स्मार्टफोन खरेदी केल्याने काय होते हे जाणून घ्या-

वाढती किंमत

काही स्मार्टफोनच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर असतात. उदा. बाजारात नवीन आलेल्या आयफोन एक्सची किंमत ८५,९९९ रुपये एवढी आहे. हफ्ते भरुन जर हा फोन विकत घेतला तर १४% वार्षिक व्याजदराने या फोनची किंमत ८९,५५० रुपये एवढी होते. त्यामुळे उगाचच जास्त पैसे खर्च होतात.

फोन EMI म्हणजेच हफ्त्यावर घ्यावा का

तसे बघायला गेले तर हल्ली तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे कमी किंमतीतही चांगले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पैसे असतील तरच महागडा फोन खरेदी करावा. कारण एकदा खरेदी केल्यानंतर दिवसागणिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत कमी होत जाते. त्यामुळे उगाचच पैसे घालून जास्त किंमतीचा फोन घेण्याचा मूर्खपणा न करणेच हिताचे ठरेल. तरी हौस असल्यास हफ्त्यांवर घेणे टाळावे. कारण त्यावर जास्त व्याज बसते आणि विनाकारण पैसे खर्च होतात.

मग यापुढे फोन घेताना खिशाला कात्री लावण्याआधी याचा विचार नक्की करा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.