Now Reading:
तरुणाईत ट्रेंडिंग होतायत हे शिवकालीन फॅशन; यातले किती तुम्ही करून पाहिलेत?
तरुणाईत ट्रेंडिंग होतायत हे शिवकालीन फॅशन; यातले किती तुम्ही करून पाहिलेत?

शिवाजी महाराज म्हटलं की नकळतच सगळ्या मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरुन येतो. मराठी माणसाचा अभिमान आणि गौरव म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचा मराठी बाणा महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे. आजची पिढी केवळ त्यांचे पुण्यस्मरण करत नाही तर त्यांचे अनुकरणही करते. मग महाराजांच्या कपाळावरील चंद्रकोर असो किंवा त्यांच्यासारखी दाढी आणि मिशी ठेवण्याची स्टाईल या ट्रेण्डची मराठी तरुणांमध्येच नव्हे तर इतर भाषिक तरुणांमध्ये खूप क्रेझ दिसून येते. मग हा महाराजांसाठी असलेला आदर आणि अभिमान दोन्हींचे दर्शन घडवतो.`

Beard and Mustache (दाढी आणि मिशी)-

आजच्या महाविद्यालयीन तरुणांमध्ये महाराजांसारख्या दाढीची ठेवण याची खूप चलती आहे. केवळ शहरातील नव्हे पण खेड्यातील मुलंही या ट्रेण्डला सर्रास फॉलो करताना दिसतात.

चंद्रकोर-

Image Source: Shutterstock

आता तुम्हाला वाटेल की चंद्रकोर केवळ स्त्रिया लावतात. पण ठसठशीत कुंकुवाची मोठी चंद्रकोर लावण्याची फॅशन आता मुलांमध्ये दिसून येते. मराठीपणाचा अभिमान आपल्या माथ्यावर असलेल्याची ही खूण असावी.

राजमुद्रा-

राजमुद्रेचे नाणे, शिलालेख, रुपया सहज पाहायला मिळतात पण आता बाजारात राजमुद्रा कोरलेली अंगठी ही फॅशनमध्ये आहे.

Tattoo (टॅटू)-

क्षत्रियकुलावंत हे उच्चारताना एक अभिमान वाटतो. त्यामुळे आजची पिढी टिपिकल टॅटूऐवजी महाराजांशी संबंधीत टॅटूला पसंती देताना दिसते.

जगदंब-

जगदंब शिवाजी महारांच्या तलवारीचे नाव आहे. अनेकांच्या गाडीवर किंवा बाईकवर जगदंबचे स्टिकर लावलेले दिसतात. बाजारात अनेक जॅकेटवर जगदंब लिहिल्याचेही पाहावयास मिळते. 

 

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.