Now Reading:
पाहा: या मराठी मुलीने केला जगावेगळा पराक्रम; नऊवारी नेसून घेतली १३,००० फुटांवरून उडी!
पाहा: या मराठी मुलीने केला जगावेगळा पराक्रम; नऊवारी नेसून घेतली १३,००० फुटांवरून उडी!

शीतल महाजन राणे हिने आपल्या स्वप्नांची भरारी घेत जगभरात विक्रमांची बरसात केली. शीतल उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून उडी मारणारी सर्वात तरुण महिला स्कायडायव्हर आहे. तसेच ती सर्वात पहिली महिला स्कायडायव्हर आहे जिने ट्रायलविना दोन्ही ध्रुवांवर हा किर्तीमान केलाय! तिच्या नावे ६ विश्वविक्रम, १७ राष्ट्रीय विक्रम आहेत तसेच तिची स्वतःची स्कायडायविंग अकादमी आहे.

“हे कीर्तिमान गाजवताना माझ्या मनात एकच विचार होता की जगाला दाखवून द्यायचे की जगातल्या कोणत्याही मंचावर भारतीय महिला यश संपादन करू शकतात.पद्मश्री किताब.”- शीतल महाजन

पद्मश्री किताब

असं संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्या गरुडझेपेने अधिराज्य गाजवलेल्या असामान्य व्यक्तीला अजून काय वेगळा सन्मान बहाल करावा? तिच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने २०११ मध्ये तिला पद्मश्री हा पुरस्कार बहाल केला होता.

मराठमोळा पराक्रम 

अशा या शीतलने नुकताच एक आगळावेगळा पराक्रम केलाय. तिने थायलंडमधील पटाया येथे १३००० फूट उंचीवरून स्कायडायविंग केलीय. आता यात काय नवल आहे? तर त्याचं असं आहे की, शीतलने हा पराक्रम नऊवारी साडी नेसून केलाय. आपल्या महाराष्ट्राची जाण ठेवण्यासाठी काहीतरी करावं म्हणून तिने हा पराक्रम आपल्या महाराष्ट्राला अर्पण केला.

शीतलने तिचे आधीचे विक्रम भारताला अर्पण केले होते कारण आपण सगळेच प्रथम भारतीय आहोत असं ती मानते. पण या वेळेस या मराठी मुलीला आपल्या मराठमोळ्या समाजासाठी काहीतरी करायचं होतं. आणि असा स्टंट कोणी यापूर्वी केला नव्हता म्हणून तिने हेच करायचे ठरवले.

पाहा हा व्हिडीओ-

 

Posted by Rohan Karkare on Monday, 12 February 2018

या पराक्रमी मुलीला आमचा सलाम!

Input your search keywords and press Enter.