Now Reading:
घरांबरोबरच बँकांना देखील दरवाजा नसलेलं गाव तरीही इथे होत नाही एकही चोरी– शनि शिंगणापूर
घरांबरोबरच बँकांना देखील दरवाजा नसलेलं गाव तरीही इथे होत नाही एकही चोरी– शनि शिंगणापूर
Shani Shingnapur, No door land, Safest village

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात स्थित ‘शनि शिंगणापूर’ गावात, शनि देवाचे चमत्कारी मंदिर आहे. हो खरचं, चमत्कारी मंदिर! कारण जेव्हा तुम्ही या गावात प्रवेश करता, तेव्हा तुम्हाला अत्यंत आश्चर्यचकित करणारी गोष्ट पाहायला मिळेल. 

या गावात कोणत्याही, बँकेला, घराला, उपहारगृहाला दरवाजा नाही

या गावात कोणत्याही बँकेला, घराला, उपहारगृहाला दरवाजा नाही. एकंदरीत कोणत्याही वास्तूस दरवाजा नाही. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, मग या गावात चोरी होत नाही का? हो, या गावात कधीच चोरी होत नाही. लोक रात्री झोपताना, कुठेही बाहेर गेले असतान, कोणत्याही वेळी घर उघडेच असतात. या घरांना दरवाजाच नाही, फक्त पडदे आहेत. या मागे लोकांच्या मानण्यानुसार शनि मंदिराशी निगडित एक कथा आहे.

एकदा या गावात खूप मोठा पूर आलेला, संपूर्ण गाव डुबत होते. जेव्हा पाण्याचा स्तर कमी झाला, तेव्हा एका व्यक्तीने झाडाच्या बुंध्याजवळ एक मोठा दगड पाहिला. तो दगड त्याला काहीसा विचित्र वाटत होता. म्हणून त्याने लालसेने त्या दगडाला फोडण्यासाठी त्यात एक टोकदार वस्तू मारली. तेव्हा त्या दगडातून रक्त येऊ लागले. ते पाहून तो व्यक्ती घाबरला व तिथून पळून गेला, त्याने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली.

सर्व गावकरी तो दगड पाहण्यास आले, परंतु त्यांना कळत नव्हते ‘या दगडाचे करायचे काय?’ त्यांनी दुसऱ्या दिवशी परत येण्याचा विचार केला. तेव्हा त्याच रात्री एका व्यक्तीच्या स्वप्नात शनि देव आले व ते त्या व्यक्तीस म्हणाले, ‘मी शनि देव आहे, जो दगड तुम्हाला आज सापडला, तो तुमच्या गावात आणून त्याची स्थापना करा.’ दुसऱ्या दिवशी लगेच त्या व्यक्तीने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली.

त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी त्या दगडाला एका मोठ्या मैदानात सूर्य किरणांच्या बरोबर खाली स्थापित केले.

या घटनेनंतर शनि देवाची या गावावर कृपा आहे, असे मानले जाते. त्यामुळे या गावात कधीच चोरी होत नाही. आणि जरी कोणत्या चोराने चोरी केली, तरी शनि देव त्याला अश्या जाळ्यात फसवतात, की तो चोरी केलेली वस्तू परत आणून ठेवतो. म्हणून या गावात लाखोंच्या रक्कमेचे दागिने असुदे, किंवा मोठी रक्कम असूदे, कधीच त्याला बंद करून किंवा लपवून ठेवत नाही. खरचं याला magic (चमत्कार) नाही तर काय म्हणणार!

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.